मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सजून-धजून घेतले सात फेरे; पण मध्यरात्री प्रियकरासोबत पळून गेली नववधू आणि त्यानंतर...

सजून-धजून घेतले सात फेरे; पण मध्यरात्री प्रियकरासोबत पळून गेली नववधू आणि त्यानंतर...

26 नोव्हेंबरच्या रात्री लग्नाचे संपूर्ण विधी सुरू झाले. इतर विधिप्रमाणे नवरा-नवरीने सात फेऱ्यांचा विधिही पूर्ण केला. यावेळी कोणाला अंदाजही नव्हता की नवरी, या सात फेऱ्यांनंतर इतकं मोठं पाऊल उचलणार आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

लखनऊ, 28 नोव्हेंबर : एका जोडप्याच्या लग्नानंतर हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. लग्नाचे संपूर्ण विधी पूर्ण केल्यानंतर वधू आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. नवरी अर्ध्या रात्री घरातून निघाली आणि पळून गेली. ती पळून गेल्याचं कोणालाही समजलं नाही. मात्र, सकाळी उठल्यानंतर प्रकरण समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. वधू घरात कुठेच दिसली नाही, त्यानंतर त्यांना ती पळून गेल्याची माहिती मिळाली.

हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील गोंडा भागातील आहे. या गावातील एक व्यक्तीने आपल्या मुलीचं लग्न मनकापूर येथे राहणाऱ्या तरुणाशी ठरवलं. 26 नोव्हेंबरच्या रात्री लग्नाचे संपूर्ण विधी सुरू झाले. इतर विधिप्रमाणे नवरा-नवरीने सात फेऱ्यांचा विधिही पूर्ण केला. यावेळी कोणाला अंदाजही नव्हता की नवरी, या सात फेऱ्यांनंतर इतकं मोठं पाऊल उचलणार आहे.

(वाचा - अशी सासू हवी? लग्नाच्या दिवशी जावयाला दिलं अस्सं गिफ्ट की.. पाहा VIDEO)

लग्नाचे सर्व विधी पार पडले. लग्नानंतर सर्वजण घरी पोहचल्यानंतर आराम करण्यासाठी गेले. यावेळी संधी साधून नवरी आपल्या बॉयफ्रेंडसोबत घरातून पळून गेली. सकाळी उठल्यावर नवरी कुठेच दिसत नसल्याचे सर्वच जणांनी घाबरून तिला शोधण्यास सुरुवात केली. परंतु त्या नवरीचा कुठेच पत्ता लागला नाही. काही वेळातच हळू-हळू नवरी पळून गेल्याची बातमी गावभर पसरू लागली.

(वाचा - विनयभंगानंतर अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई न करण्याचं ठरवलं आहे. याप्रकरणात पोलीस स्थानकात केस दाखल न करण्याचं दोघांकडून ठरवण्यात आलं आहे. पोलिसांनीही असं कोणतंही प्रकरण दाखल केलं नसल्याचं सांगितलं आहे.

First published:

Tags: Crime, Marriage, Wedding