मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नवराच नाही तर सासऱ्याच्या पायाखालचीही सरकली जमीन, नव्या नवरीचं कृत्य वाचून व्हाल हैराण

नवराच नाही तर सासऱ्याच्या पायाखालचीही सरकली जमीन, नव्या नवरीचं कृत्य वाचून व्हाल हैराण

नवरीच्या (Bride) माहेरकडच्या मंडळींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित प्रकरण आता पोलीस (Police) ठाण्यात पोहोचलं आहे.

नवरीच्या (Bride) माहेरकडच्या मंडळींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित प्रकरण आता पोलीस (Police) ठाण्यात पोहोचलं आहे.

नवरीच्या (Bride) माहेरकडच्या मंडळींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित प्रकरण आता पोलीस (Police) ठाण्यात पोहोचलं आहे.

लखनऊ 08 मे : आजकाल अशा अनेक घटना समोर येत आहेत ज्यात नवरीबाई ऐनवेळी एखाद्या कारणामुळे लग्नाला (Marriage) नकार देते किंवा दोघांच्यातलं एक कोणीतरी ऐनवेळी फरार होतं. आता आणखी एका नवरीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सासरकडच्या मंडळींनी नवरीवर (Bride) दागिने आणि पैसे घेऊ फरार झाल्याचा आरोप केला आहे. जेव्हा हे प्रकरण पोलिसांत (Police) पोहोचलं तेव्हा नवरीच्या माहेरचे लोकही ठाण्यात पोहोचले. त्यांनी नवरी दागिने आणि पैसे (Money) घेऊन फरार झाल्याचा आरोप खोटा असल्याचं म्हटलं. ठाण्यात दोन्ही पक्षांमध्ये बातचीत झाली आणि पोलिसांनी नवरीबाई हरवल्याची तक्रार दाखल करुन घेतली.

लॉकडाऊनमध्ये पालक घरात तर मुलं बाहेर; खेळताना कारमध्ये श्वास गुदमरल्याने मृत्यू

हे प्रकरण आहे आगरामधील एत्माद्दौला परिसरातील. पोलीस संजय कुमार त्यागी यांनी सांगितलं, की नगला मोहनलाल येथील रहिवासी नेमीचंद यांनी काही महिन्यांपूर्वी आपला मुलगा रामलखन याचा विवाह पंजाबमधील फिरोजपुर येथील खुशबू हिच्यासोबत लावून दिला. गुरुवारी हे कुटुंब एका लग्नासाठी गेलं होतं. ते घरी परतले तेव्हा खुशबू घरातून गायब होती. नेमीचंद यांनी पोलिसांना सांगितलं, की ती घरातून 50 हजार रुपये आणि दागिने घेऊन फरार झाली आहे.

धक्कादायक! पत्नीनं बॉयफ्रेंडला घरी बोलावल्यानं संतापलेल्या पतीनं केली तिची हत्या

या प्रकरणाची माहिती मिळताच खुशबूचे नातेवाईकही पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळत आपली मुलगी हरवल्याचं सांगितलं. पोलिसांनी ठाण्यातच दोन्ही पक्षातील लोकांसोबत बातचीत केली. यानंतर दोन्ही पक्षांच्या सहमतीनं खुशबू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करुन घेतली. संजय कुमार त्यागी यांनी सांगितलं, की खुशबू खरंच दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली का, हे तिचा शोध लागल्यानंतरच समजू शकेल. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Crime, Financial fraud, Marriage