मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'ती'ने रस्त्यावर कपडे फाडले आणि धमकी देऊन दीड लाख मागितले, प्रियकराने पुढे जे केलं ते....

'ती'ने रस्त्यावर कपडे फाडले आणि धमकी देऊन दीड लाख मागितले, प्रियकराने पुढे जे केलं ते....

मुंबईतील (Mumbai) वांद्रे परिसरात (Bandra) बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून प्रियकराने हत्या केल्याची घटना...

मुंबईतील (Mumbai) वांद्रे परिसरात (Bandra) बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून प्रियकराने हत्या केल्याची घटना...

मुंबईतील (Mumbai) वांद्रे परिसरात (Bandra) बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून प्रियकराने हत्या केल्याची घटना...

मुंबई, 01 जून : मुंबईतील (Mumbai) वांद्रे परिसरात (Bandra) बलात्काराच्या गुन्ह्याची (Rape case) धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासांनी वांद्रे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बिपीन विनोद कंडुलना असं या आरोपीचं नाव आहे. तर इशिता कुंजुर असं या मृत तरुणीचे नाव आहे. आरोपी आणि मृत मुलीची एका वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्या मैञीचे रुपांतर प्रेमात झाले.

आरोपी बिपीन हा वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तर मृत मुलगी घरकाम करायची. रविवारी रात्री पीडित मुलगी आरोपीच्या लाल मिठी परिसरातील घरी आली होती. दोघांमध्ये शारिरीक संबध झाल्यानंतर पीडित मुलगी आरोपीकडे दीड लाख रुपयांची मागणी करू लागली. पैसे न दिल्यास आरोपीला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागली.

त्यानंतर आरोपीने तिची समजूत काढून वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी गेले. त्यावेळी वांद्रे पश्चिम येथील सेंट फ्रेंसिस्कोच्या गल्लीत पुन्हा पीडितेने पैसे मागण्यास सुरुवात केली. आरोपीने वारंवार समजावण्याचा प्रयत्न करून देखील मृत मुलीने स्वत:चे कपडे फाडून घेत. आरडा ओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केली.

मृतदेह मिळाल्यानंतर वांद्रे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीची आणि मृत मुलीची कोणतीही माहिती नसताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आरोपीला 12 तासात अटक केली.

आरोपी आणि  मृत तरुणी हे दोघेही मुळचे झारखंडचे रहिवाशी असल्याची माहिती तपासात समोर आली असून गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Mumbai