मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गहुंजे स्टेडियमजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ

गहुंजे स्टेडियमजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ

पहाटे मंदिराकडे  जाणार्‍या पायवाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अज्ञात व्यक्ती आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

पहाटे मंदिराकडे जाणार्‍या पायवाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अज्ञात व्यक्ती आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

पहाटे मंदिराकडे जाणार्‍या पायवाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अज्ञात व्यक्ती आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

आनिस शेख, प्रतिनिधी

तळेगाव, 08 जानेवारी : पुणे (Pune) जिल्ह्यातील तळेगाव पोलीस (Talegaon Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गहुंजे स्टेडियमजवळ (pune gahunje stadium) एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाचा घटनास्थळी खून करण्यात आला की मृतदेह इथं आणून टाकला, याचा तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे स्टेडियमजवळ असलेल्या घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला 25 ते 30 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आज पहाटे आढळून आला. घोरवडेश्वर डोंगरावर दर्शनासाठी तसंच व्यायाम करण्यासाठी पहाटेच्या वेळेस डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरम्यान, पहाटे मंदिराकडे  जाणार्‍या पायवाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अज्ञात व्यक्ती आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

दुष्काळातही फुलवली रंगीत मिरचीची शेती, 3 महिन्यात सात लाखाचं उत्पन्न

स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तात्काळ तळेगाव पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पाहणी केली आणि मृतदेह ताब्यात घेतला.  निळया रंगाची जीन्स पॅन्ट तसंच पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या अंदाजे 25 ते 30 वर्षीय इसमाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची बाब तपासात पुढे आली आहे.

तपासादरम्यान मयताच्या गळ्यावर एक रुपयाचे नाणे आढळून आल्याने पोलीस या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावू लागले आहेत.  तसंच मयत इसम हा मजूर असल्याची  प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सचिन तेंडुलकर, लतादीदींच्या ट्वीटची होणार चौकशी, गृहमंत्र्यांनी दिले आदेश

डोंगर पायथ्या लगत असलेली सदरची जागा ही वन विभागाच्या अखत्यारित असल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून वन विभागाकडून घोषित करण्यात आले आहे तरी देखील सायंकाळच्या वेळेस हुल्लडबाजांचे टोळके मद्यपानासाठी या जागेचा वापर करतात.

तळेगाव पोलीस ठाणे तसंच क्राईम ब्रांच युनिट 5 च्या पथकाने घटनास्थळावरील सुगाव्याच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असून अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.

First published:

Tags: Crime, Murder, Police, Pune crime, Pune news, पुणे