मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

झाडावर लटकलेला आढळला CRPF जवानाचा मृतदेह; 5 दिवसांपूर्वीच सुट्टीवर आले होते घरी

झाडावर लटकलेला आढळला CRPF जवानाचा मृतदेह; 5 दिवसांपूर्वीच सुट्टीवर आले होते घरी

पाच दिवसांपूर्वीच राजीव सुट्टीवर आपल्या घरी आले होते.

पाच दिवसांपूर्वीच राजीव सुट्टीवर आपल्या घरी आले होते.

पाच दिवसांपूर्वीच राजीव सुट्टीवर आपल्या घरी आले होते.

  • Published by:  Meenal Gangurde
शामली, 20 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शामली जिल्ह्यातील केंद्रीय रिझर्व पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) (CRPF) एका जवानाचा मृतदेह (CRPF Jawan suicide) झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. ही आत्महत्या असल्याची संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीआरपीएफचे एक जवान राजीव सुट्टीवर घरी आले होते. पाच दिवसांपूर्वीच राजीव कांधला भागातील आपल्या घरी आले होते.  स्थानिक पोलिसांनी दिलेल्या वक्तव्यानुसार, ते शनिवारी सायंकाळी झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्यांनी हे पाऊल का उचललं, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे ही वाचा-गरीब आणि दलित वस्तीवर नजर; मदतीच्या बहाण्याचे मोठं पॅकेज, धर्मपरिवर्तनाचा खेळ! पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिकदृष्ट्या हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा नेमका खुलासा होईल. याशिवाय जवानाच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. आत्महत्येच्यादृष्टीने या घटनेचा तपास केला जात आहे.
First published:

Tags: Sucide

पुढील बातम्या