मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हॉटेलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला मृतदेह; तिकीट खरेदी करून पाहिली Live चीर-फाड

हॉटेलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला मृतदेह; तिकीट खरेदी करून पाहिली Live चीर-फाड

पत्नीने एका कंपनीला पतीचा मृतदेह दान केला होता.

पत्नीने एका कंपनीला पतीचा मृतदेह दान केला होता.

पत्नीने एका कंपनीला पतीचा मृतदेह दान केला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर : कोविड-19 मुळे (Covid -19) मृत्यू झालेल्या एका 98 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गेल्या महिन्यात डाउनटाउन पोर्टलँड हॉटेलच्या आत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मृतकच्या पत्नीने आपल्या पतीचा मृतदेह वैज्ञानिक प्रयोगासाठी दान केलं होतं. मात्र मृतदेह परीक्षणासाठी ठेवण्यात आलं होतं. मृत डेविड सॉन्डर्स लुइसियानामध्ये आपल्या 92 वर्षीय पत्नीसोबत राहत होते. त्यांचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला होता.

पोर्टलँड मॅरियट डाउनटाउन वॉटरफ्रंटच्या एका मीटिंग रूममध्ये (Meeting Room) डेविडच्या मृतदेहाची चीर-फाड करण्यासाठी 70 लोकांच्या समोर ठेवला होता. लोकांनी यासाठी 500 डॉलरपर्यंत तिकीट दिलं. हे एक अत्यंत बीभत्स दृश्य होतं. येथे लोक मृतदेहाची चीरफाड पाहण्यासाठी तिकीट खरेदी करीत होते. मुल्नोमा काउन्टीच्या मुख्य मेडिकोलीगल डेथ इन्वेस्टिगेटर किम्बर्ली डिलियो यांनी सांगितलं की, त्यांनी याबाबत आधीच पोर्टलँड पोलिस ब्यूरो आणि ओरेगन मेडिकल बोर्डाला सांगितलं होतं.

पोलिसांनी सांगितलं की, नागरिक कायद्याचं उल्लंघन केल्याचा प्रकार...

सध्या या संपूर्ण प्रकरणात तपास सुरू आहे. डिलियोने सांगितलं की, ज्या प्रमाणे सॉन्डर्सच्या शरीरासह व्यवहार करण्यात आला, त्याला मृतदेहाचा दुरुपयोग केल्याचं प्रकरण होऊ शकतं.

कुटुंबीयासाठी भयावह आठवण

डिलियोने सांगितलं की, डेथ इन्वेस्टिगेटरच्या रुपात काम करीत असताना आपल्या 20 वर्षांच्या अनुभवात त्यांनी असं कधीच पाहिलं नाही. मीडियाशी बातचीत करताना त्यांनी ही आठवण अत्यंत भयावह असल्याचं सांगितलं. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याच्या मृतदेहासोबत असं काही करण्यात आलं, ही आठवण भयावह आहे.

पत्नी म्हणाली, मी काहीच बोलू शकत नाही..

सॉन्डर्सच्या पत्नीने सांगितलं की, जेव्हा तिने आपल्या पतीचा मृतदेह मेड एड लॅब्सला दान केलं होतं, त्यावेळी सांगण्यात आलं होतं की, कंपनी महिलेच्या पतीच्या मृतदेहाचा उपयोग रिसर्चसाठी करेल आणि अंत्यसंस्कारानंतर त्यांचे अवशेष परत करेल. पतीच्या मृतदेहासोबत असं काही केलं जाणार असल्याचं महिलेला माहिती नव्हतं.

हे ही वाचा-कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर? 53 देशांनी वाढवली चिंता, नव्या लाटेची शक्यता

मीडिया कंपनीने इव्हेंटसाठी मृतदेह केला होता खरेदी..

मीडिया रिपोट्सनुसार, मीडिया कंपनी डेथ साइंसने मेड एड लॅब्सने सॉन्डर्सच्या शरीराची खरेदी केली होती. कंपनी या मृतदेहाचा उपयोग एका इव्हेंटमध्ये करणार होती. डिलियोने सांगितलं की, हा कार्यक्रम पहिल्यांदा कोर्टयार्ड पोर्टलँड सिटी सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. डेथ साइंसचे संस्थापक जेरेमी सिलिबर्टोने बुधवारी एका वक्तव्यात सांगितलं की, त्यांनी मेड एड लॅब्सकडून सॉन्डर्सचा मृतदेह खरेदी केला होता. त्यांनी सांगितलं की, कंपनीने त्यांना सांगितलं नव्हतं की, त्यांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला होता.

First published:

Tags: America, Covid-19, Dead body