Home /News /crime /

जळगाव हादरलं, एकाच घरात आढळले अल्पवयीन बहीण भावासह 4 जणांचे मृतदेह

जळगाव हादरलं, एकाच घरात आढळले अल्पवयीन बहीण भावासह 4 जणांचे मृतदेह

रावेर शहराजवळच असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी रावेर, 16 ऑक्टोबर :  जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळच असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच वेळी चार अल्पवयीन मुलांच्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील मुस्‍तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे गेले आहे. घरात त्यांची  चारही मुले एकटी होती. त्यातील सईता (वय 12 वर्ष)  रावल (वय 11 वर्ष ) अनिल (वय 8 वर्ष) आणि सुमन (वय 3 वर्ष) एकटीच राहत होती. मोठी मुलगी सईता ही सर्वांची देखभाल करत होती. शेता शेजारीच हे कुटुंब घर बांधून राहत होते. Shocking VIDEO: भाजप आमदाराच्या निकटवर्तीय नेत्याकडून पोलिसांसमोरच गोळीबार आज सकाळी शेत मालक मुस्‍तुफा हे शेतावर गेले असता घराजवळ कुणीच दिसलं नाही. त्यांनी मुलांना आवाज दिला, पण कुणीही प्रतिसाद देत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घरात डोकावून पाहिले असता चौघांचे मृतदेह आढळून आले. चौघांचे मृतदेह पाहून मुस्तुफा यांना मोठा धक्का बसला. तातडीने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर  विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. चौघांही चिमुरड्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. चौघांचा कुऱ्हाडीने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.  7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नराधमाने ओठ दाताने तोडला दरम्यान, महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव इथं घडली आहे. एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला.  वडगाव कोल्हाटी इथं गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.  7 वर्षीय चिमुकली मिस्त्री काम करणाऱ्या आजी व मामाकडे आलेली होती. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मुलीला आरोपीने घरातून अलगद पांघरुणासहीत उचलून नेले. त्यानंतर जवळच्या रिकाम्या प्लॉटमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अत्याचार सुरू असताना या नराधमाने पीडित चिमुरडीचा ओठ दाताने चावून तोडला.  यावेळी मुलगी जोरात ओरडल्याने शेजारील लोकं येतील या भीतीने आरोपीने  तिथेच तिला सोडून धूम ठोकली. त्यानंतर आवाज झाल्यामुळे लोकांनी धाव घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  रक्तबंबाळ अवस्थेतील मुलीला नातेवाईकांनी व शेजारील लोकांनी औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात रवाना केले. मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या