मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भला मोठा कंटेनर रिक्षावर पलटला; 4 जणांचा जागीत मृत्यू, अडीच तासांनी मृतदेह काढले बाहेर!

भला मोठा कंटेनर रिक्षावर पलटला; 4 जणांचा जागीत मृत्यू, अडीच तासांनी मृतदेह काढले बाहेर!

तांदळाच्या गोण्यांनी भरलेला कंटेनर हा रिक्षेवर पलटला. या अपघातात रिक्षा चालकासह त्यातील प्रवासी असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.

तांदळाच्या गोण्यांनी भरलेला कंटेनर हा रिक्षेवर पलटला. या अपघातात रिक्षा चालकासह त्यातील प्रवासी असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.

तांदळाच्या गोण्यांनी भरलेला कंटेनर हा रिक्षेवर पलटला. या अपघातात रिक्षा चालकासह त्यातील प्रवासी असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : देशाची राजधानी दिल्लीत (New Delhi News) आरटीओजवळील रिंग रोडवर शनिवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात (Shocking Accident) झाला. या अपघातात 14 वर्षीय मुलासह चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तांदळाच्या गोण्यांनी भरलेला कंटेनर हा रिक्षेवर पलटला. या अपघातात रिक्षा चालकासह त्यातील प्रवासी असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये रिक्षा चालक सुरेंद्र कुमार यादव (37), त्याचा पुतण्या जय किशोर यादव (31) आणि दोन प्रवासी कोमल सिंह (35) व कोमल यांचा भाचा प्रकाश (14) यांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी सुरेंद्र प्रवासी घेऊन शास्त्री पार्कमधील सराय काले खाच्या दिशेने जात होते. यावेळी सुरेंद्रचा पुतण्या जय किशोर देखील चालकाच्या शेजारील सीटवर बसला होता. या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अक्षरश: रिक्षाचं छत रस्त्याला लागलं होतं. हा अपघात इतका भीषण होता की, शेवटी रिक्षा कापून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हे ही वाचा-राजधानी हादरली! घरमालकाने भाडेकरूला दिला भयंकर मृत्यू; पत्नीलाही मारहाण

कसा झाला अपघात?

शनिवारी सकाळी काही क्षणात रिक्षात बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाची अवस्था पाहून नागरिकही हादरले. शनिवारी सकाळी भला मोठा  कंटेनर रिक्षावरच पलटला. यानंतर तातडीने पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मात्र रिक्षातून मृतदेह काढणं अत्यंत कठीण होतं. कारण मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या कंटेनरमध्ये 50 टन तांदूळ भरलेले होते. यामुळे तो हटवण्यासाठी आधी वाहतूक पोलिसांनी दोन क्रेन बोलावले. याशिवाय आणखी क्रेनची गरज भासली. बरेच प्रयत्न केल्यानंतर तब्बल अडीच तासांनी चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Crime news, Delhi, Road accident