वाराणसी, 26 सप्टेंबर : वाराणसीमध्ये (Varanasi News) संपत्तीच्या वादात (Property Dispute) नात्याचाच खून केला. मोठ्या भावाने आपला धाकटा भाऊ आणि त्याच्या पत्नीवर हातोड्याने वार करीत दोघांची हत्या केली. कुटुंबात झालेल्या या डबल मर्डरमुळे खळबळ उडाली. हत्या करणारा (Crime News) आरोपी कृत्य केल्यानंतर फरार झाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आलं.
ही घटना लोहता पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे मुन्ना नावाच्या एका व्यक्तीने आपला लहान भाऊ निसार आणि त्याची पत्नी खूशबू यांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणात तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. हत्येच्या मागे संपत्तीवरुन होणार वाद कारण असल्याचं सांगितलं जात आबे. ज्यातूनच मोठ्या भावाने लहान भावासह त्याच्या पत्नीची हत्या केली. (The big brother in law put the hammer on the head of sister in law and Brother)
सांगितलं जात आहे की, दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू होता. रविवारी लहान मुलांना जेवू घालणं खूशबु आणि तिच्या पतीला महागात पडलं. मोठ्या भावाने यावर आक्षेप घेत शिव्या-शाप सुरू केला. जेव्हा छोट्या भावाने अडवण्याचा प्रयत्न केला तर हातोडा घालून त्याची हत्या केली. त्याची पत्नी मध्ये आली तर तिलाही हातोड्याने मारहाण केली. यात रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा-
GF सोबतचे प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला पाहताच तरुण हादरला
एडीजी ब्रिज भूषण यांनी सांगितलं की, भाऊ आणि त्याच्या पत्नीची हत्या करून मुन्ना घटनास्थळाहून फरार झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितलं की, घटनेत हातोड्याचा वापर करण्यात आला आहे. जे घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच आरोपी मुन्नालाही ताब्यात घेण्यात येणार आहे.