मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तो जोरजोरात ओरडत राहिला; दाढी ठेवली म्हणून मारहाण, आई-मुलाचे अंतर्वस्त्र काढून...

तो जोरजोरात ओरडत राहिला; दाढी ठेवली म्हणून मारहाण, आई-मुलाचे अंतर्वस्त्र काढून...

सुरुवातीला पोलीसही या प्रकरणात तक्रार लिहून घ्यायला तयार नव्हते.

सुरुवातीला पोलीसही या प्रकरणात तक्रार लिहून घ्यायला तयार नव्हते.

सुरुवातीला पोलीसही या प्रकरणात तक्रार लिहून घ्यायला तयार नव्हते.

    भोपाळ, 7 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्याच्या औद्योगिक भागातील निमरानीमध्ये मॉब लिन्चिंगची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी फॅक्टरीच्या बाहेरील गर्दीने एका तरुणाने चोरीचा संशय व्यक्त करीत निर्वस्त्र करीत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकच नाही, या प्रकरणात उशीर तक्रार दाखल केल्या प्रकरणी एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. अद्यापही या प्रकरणात तपास सुरू आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, तरुणाला दाढी असल्याकारणाने त्याला मारहाण करण्यात आली होती. व्हिडीओमध्ये वारंवार त्याचं नाव विचारून विशेष धर्माचं असल्याचं सांगत मारहाण केली जात होती. पीडितेच्या आईनेही सांगितलं की, मुलाला एका विशेष धर्माचं असल्याचं सांगत त्याचे कपडे काढून तपासण्यात आले. आधीच पीडित व्यक्तीने आपलं नाव आणि जात त्यांना सांगितली होती. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एका जमावाने दाढी असलेल्या व्यक्तीला लाठीने मारहाण केली. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, मार खाणाऱ्या व्यक्तीला वारंवार त्याचं नाव विचारलं जात आहे. त्याचा एका विशेष धर्माचा असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी मार खाणारी व्यक्ती वारंवार आपलं नावदेखील सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्टच्या रात्री ढोल वाजवणाऱ्या तरुणाची चोरीच्या संशयाने अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. पीडित व्यक्तीच्या भावाला जेव्हा व्हायरल व्हिडीओची माहिती मिळाली, तर त्याने पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. शेवटी हे प्रकरण वाढलं, आणि दबावानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या