मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबईत नायलॉनच्या मांजाने कापला पोलीस अधिकाऱ्याचा गळा!

मुंबईत नायलॉनच्या मांजाने कापला पोलीस अधिकाऱ्याचा गळा!

सरकारी बंदीनंतरही नायलॉन मांजाची (nylon manza) विक्री राज्यात सुरुच आहे. मुंबईत (Mumbai) पोलीस अधिकाऱ्याचाच गळा यामुळे कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सरकारी बंदीनंतरही नायलॉन मांजाची (nylon manza) विक्री राज्यात सुरुच आहे. मुंबईत (Mumbai) पोलीस अधिकाऱ्याचाच गळा यामुळे कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सरकारी बंदीनंतरही नायलॉन मांजाची (nylon manza) विक्री राज्यात सुरुच आहे. मुंबईत (Mumbai) पोलीस अधिकाऱ्याचाच गळा यामुळे कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबई, 18 जानेवारी : सरकारी बंदीनंतरही नायलॉन मांजाची (nylon manza) विक्री राज्यात सुरुच आहे. या जीवघेण्या मांजामुळे दुर्घटना घडल्याच्या घटना नाशिक (Nashik) आणि नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी उघड झाल्या होत्या. आता राजधानी मुंबईत (Mumbai)  पोलीस अधिकाऱ्याचाच गळा मांजामुळे कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या वरळी पोलीस स्टेशनचे साहय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला. गवळी शनिवारी दुचाकीवरुन जात असताना, जे.जे. मार्गाजवळील जंक्शनजवळ ही दुर्घटना घडली. त्यामध्ये ते थोडक्यात बचावले. गवळी यांच्या गळ्याचं ऑपरेशन करण्यात आलं असून 10 टाके घालण्यात आले आहेत.

(वाचा - मुंबईतून GOOD NEWS, प्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट)

राज्यभर प्रकार सुरु

नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी आदित्य संतोष भारद्वाज या 17 वर्षांच्या मुलाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला होता. तो बाईकवरून क्लासला जात होता. तेव्हा ही घटना घडली. गोधनी-मानकापूर रोडवरील नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला गुंडाळला गेला. दुचाकी वेगात असल्यामुळे गळा कापला गेला आणि तो गाडीवरून पडला आणि गंभीर जखमी झाला.

आदित्यला नागरिकांनी तात्काळ गोधनी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला मानकापूर चौकातील अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आदित्यच्या गळा जास्तच चिरला गेल्याने तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे प्राण थोडक्यात बचावले. नाशिकमध्येही एका महिलेचा यामुळे मृत्यू झाला होता.

दरम्यान, राज्य सरकारनं 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू आहे. या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai