Home /News /crime /

चखणा खाल्ला म्हणून संतापलेल्या नवऱ्याने बायकोला पेटवले, विरारमधील धक्कादायक घटना

चखणा खाल्ला म्हणून संतापलेल्या नवऱ्याने बायकोला पेटवले, विरारमधील धक्कादायक घटना

वीरेंद्र दारू पिऊन घरी आला होता. येताना त्याने आपल्यासोबत चखणा आणला होता. काही वेळानंतर...

    विरार, 03 ऑक्टोबर : दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा नेम नाही.  दारू पिण्यासाठी आणलेला चखणा बायकोने खाल्यामुळे रागाच्या भरात पतीने तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार,  26 सप्टेंबर रोजी विरार पूर्व फुलपाडा परिसरात ही घटना घडली. आरोपी वीरेंद्र परब (वय 50) हा दारूच्या आहारी गेला होता. 26 सप्टेंबरच्या रात्री सुद्धा वीरेंद्र दारू पिऊन घरी आला होता. येताना त्याने आपल्यासोबत चखणा आणला होता. काही वेळानंतर त्याची पत्नी नमिता परबने वीरेंद्रने आणलेला चखणा खाऊन टाकला. ही बाब वीरेंद्रच्या लक्षात आल्यावर त्याने तिच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात वीरेंद्रने आपल्या पत्नीला पेटवून दिले. यात ती 30 टक्के भाजली. 'अयोध्येनंतर आता...' शरद पवारांनी 'या' चर्चेबद्दल व्यक्त केली चिंता, म्हणाले... काही वेळानंतर वीरेंद्रनेच जखमी पत्नीला संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार घेतल्यानंतर नमिता आपल्या घरी परत आली.  त्यानंतर ती आपल्या भावाकडे गेली. त्यानंतर नमिताने आपल्यासोबत घडलेला प्रसंग भावाला सांगितला. नमिता आणि तिचा भाऊ हे दोघेही पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यावेळी रुग्णालयाने विरार पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर नमिताचा जबाब नोंदवून घेतला. दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके! VIDEO तुफान व्हायरल नमिताने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी वीरेंद्रला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: विरार

    पुढील बातम्या