Home /News /crime /

धुळ्यातील खळबळजनक घटना, आढळला महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह!

धुळ्यातील खळबळजनक घटना, आढळला महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह!

धुळे औरंगाबाद महामार्गावरील गरताडबारी परिसरात हा मृतदेह जमिनीत अर्धवट पुरण्यात आला होता.

धुळे, 30 ऑक्टोबर : धुळे (Dhule) तालुक्यातील गरताडबारी परिसरामध्ये एका महिलेचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय महिलेचा हा मृतदेह असून घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धुळे औरंगाबाद महामार्गावरील गरताडबारी परिसरात हा मृतदेह जमिनीत अर्धवट पुरण्यात आला होता. जनावरं चारण्यासाठी आलेल्या गुराख्यांना या भागांमध्ये दुर्गंधी आली. त्यांनी पाहणी केली असता सर्वांना धक्का बसला. त्यानंतर तातडीने याबद्दल मोहाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर  पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी  महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह बाहेर काढला. मुंबईत ड्रग्स माफियांचा सुळसुळाट, 2 वेगवेगळ्या घटनेत 50 लाखांचे ड्रग्स जप्त मृत महिलेचा मृतदेह कुजला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तर हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून मोहाडी पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदर महिला ही 25 ते 30 वर्षात आतील असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेजवळ संशयास्पद कुठलीही वस्तू किंवा कागदपत्र आढळून आले नसल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. अनैतिक संबंधातून विधवा सूनेसह प्रियकराची निर्घृण हत्या दरम्यान, अनैतिक संबंधातून विधवा सूनेसह तिच्या प्रियकराची ट्रॅक्टरनं चिरडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जालन्यात घडली आहे. या प्रकरणी महिलेचा सासरा आणि दीराला पोलिसांनी अटक केली आहे. मारिया लालझरे आणि हरबक भागवत अशी मृतांची नावं आहे. चपळगाव (जि.जालना) येथे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पुणे हादरलं, दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास लालझरे आणि त्याचे वडील बथवेल लालझरेला अटक केली आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या