Home /News /crime /

मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून 11 वर्षाच्या लहान भावाने केली आत्महत्या

मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून 11 वर्षाच्या लहान भावाने केली आत्महत्या

लहान भावाने समोसा देण्यासाठी हट्ट धरला. परंतु, दोघांमध्ये समोस्यावरून बोलणे होत असतानाच मोठ्या भावाने समोसा पूर्ण खाल्ला.

नागपूर, 21 जुलै : घरात भावडांमध्ये भांडण होणे हे नवीन नाही, प्रत्येक घरात लहान भावडांची कुठल्या न कुठल्या कारणावरून भांडणं होतच असतात. पण, नागपूरमध्ये मोठ्या भावाने समोसा खाऊन टाकल्यामुळे रागाच्या भरात 11 वर्षांच्या लहान भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील गिट्टीखदान परिसरात घडली आहे.  वीरू नत्थू असं मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नत्थू साहू हे पत्नी व दोन मुलांसह गंगानगर काटोल रोडवर राहतात. त्यांचा मोठा मुलगा धीरज (वय13) आठवीत शिकतो. लहान मुलगा वीरू (वय 11) पाचवीत शिकत होता. नत्थू मूळचे मध्य प्रदेशातील असून, भाजीपाला विक्री व्यवसाय करतात. साहू हे भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. OMG! 14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का? रविवारी मोठा मुलगा धीरजने  बाहेरून एक समोसा खाण्यासाठी घरी आणला होता. त्यामुळे लहान भावाने समोसा देण्यासाठी हट्ट धरला. परंतु, दोघांमध्ये समोसा वरून बोलणे होत असतानाच मोठ्या भावाने समोसा पूर्ण खाल्ला. याचा राग लहान मुलगा वीरूला आला. त्यानंतर वीरू रागाच्या भरात आपल्याच घरच्या आतील खोलीत गेला आणि आतून दरवाजा लावला, यावेळी घरचे मंडळी घराचा बाहेर बसले होते. मुंबईत महिलेला तब्बल 11 लाखांना लुटले, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून! अर्धा तास वीरू खोलीच्या बाहेर न आल्याने आईने दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून बघितले असता त्याने छताचा रॉड ला साडीने गळफास लावलेला दिसला. त्याला बघून आईने हंबरडा फोडला. केवळ समोसा वरून एका 11 वर्षाच्या चिमुकल्याने घरीच आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या