Home /News /crime /

अकोला शहरातील 'ती' भयावह मध्यरात्र; चोरी केल्याच्या संशयावरुन दगडाने ठेचून हत्या

अकोला शहरातील 'ती' भयावह मध्यरात्र; चोरी केल्याच्या संशयावरुन दगडाने ठेचून हत्या

घटनास्थळी रक्ताने माखलेले दगड सापडले आहेत

अकोला, 7 मार्च : अकोला शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेहरू पार्कजवळ 35 वर्षीय व्यक्तीची चोरीच्या संशयावरून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. हत्येच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात तपास सुरू आहे. अकोला शहरात वाढती गुन्हेगारी डोके वर काढत आहे. गुन्हेगारी वृत्ती ही पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी झाली आहे. वाढती गुन्हेगारी पाहता अकोला शहर गुन्हेगारीचा गड बनत असताना दिसत आहे. पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावत असले तरी गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही. काल मध्यरात्रीच्या सुमारास अकोल्यातील नेहरू पार्क चौकाजवळ दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. 35 वर्षीय या इसमाचे नाव श्याम शंकर घोडे असून ही व्यक्ती खदान परिसरातील सरकारी गोडाऊनच्या मागे राहत होती. श्याम घोडे हे गवंडी काम करीत असल्याची माहिती मिळाली असून रात्रीच्या सुमारास आरोपींनी दगडाने ठेचून श्याम घोडे यांची हत्या करून फरार झाले. हे ही वाचा-वर्गात रागावून ओरडल्यानं नाराज, बारावीच्या मुलानं केला शिक्षकावर गोळीबार घटनास्थळी दोन चिलम व रक्ताने माखलेले दगड सापडल्याने ही हत्या नशेत करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तातडीने पंचनामा करून मृतदेह रात्रीच शवविच्छेदनासाठी अकोला जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आला. हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी आठ तासात ताब्यात घेतले. हत्येच्या कारणाचा तपास करत असताना चोरीच्या उद्देशाने आल्याच्या संशयावरून श्याम घोडेची दगडाने ठेचून हत्त्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी नेहरू चौक स्थित फुटपाथवर दुकान लावणाऱ्या सुमित शर्मा या 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या हत्येमध्ये आणखी किती जण सामील होते. आणि या मागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Akola News, Crime news, Murder

पुढील बातम्या