मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ठाण्यात सोसायटीत घुसून वृद्ध महिला टार्गेट; मदत मागेपर्यंत आरोपी फरार

ठाण्यात सोसायटीत घुसून वृद्ध महिला टार्गेट; मदत मागेपर्यंत आरोपी फरार

सोनसाखळी चोरी

सोनसाखळी चोरी

ठाणे शहरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दिवसाढवळ्या ओढून नेल्याची घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India

ठाणे, 4 फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसा ढवळ्या वृद्धांना लक्ष्य केल्याच्या घटनेने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार गुन्हेगाराने थेट सोसायटीत घुसून केला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे. ही घटना सीसीटिव्ह कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

ठाणे शहरातील चरई येथील निर्मला अपार्टमेंटमध्ये इमारतीची लिफ्टची वाट पाहत उभी असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेली आहे. वृद्ध महिलेच्या पाठीमागे हा चोर अपार्टमेंटमध्ये शिरला होता. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होते. महिला लिफ्टच्या दरवाजाजवळ उभी राहिल्यानंतर त्याने आसपास कोणी नसल्याचा अंदाज घेतला. यावेळी महिलेला गहाळ असल्याचे पाहून त्याने गळ्यातील चैन ओढून नेली. घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत तो चोर अपार्टमेंटमधून पसार झाला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तसाप करत आहेत.

वाचा - तरुणीने आखला स्वत:च्याच हत्येचा कट, कारण समोर येताच पोलिसांनाही बसला धक्का

बनावट शस्त्राचा धाक दाखवून लुटले

बनावट शस्त्राचा धाक दाखवून एका व्यक्तीला अडीच लाखाचा लुटल्याची घटना कळव्यातील खारेगाव येथे घडली. या प्रकरणी कळवा पोलिसांनी कुठलेही पुरावे नसताना कसोशीने तपास करून 4 जणांना अटक केली आहे. या चौघांपैकी एक जण अल्पवयीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील कळवा खारेगाव टोळनाका येथे एका टोळीने दुचाकी स्वारला अतडवून त्याला बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना कळवा पोलीस ठाण्यात घडली. फिर्यादी यांचे भिवंडीमध्ये दुकान आहे. फिर्यादी 16 जानेवारी रोजी आपलं दुकान बंद करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरी परतत होते. त्याच दरम्यान अज्ञात टोळीने त्यांचा पाठलाग करून खारेगाव टोळ नाका येथे रस्त्याचे काम सुरू असलेल्या निर्जन स्थळी गाडी आडवी लावून सोबत असलेली पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी बनावट बंदूक काढून धाक दाखवून फिर्यादीकडे असलेले अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि 3 मोबाईल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी फिर्यादी यांनी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

First published:

Tags: Crime, Thane