विकास दुबेंच्या या गुंडालाही वाटते Encounterची भीती; म्हणाला, रस्ता मार्गे नकोच
विकास दुबेंच्या या गुंडालाही वाटते Encounterची भीती; म्हणाला, रस्ता मार्गे नकोच
उज्जैन ते राजस्थान, राजस्थानहून पुण्याला, पुण्याहून नाशिकला आणि शेवटी भाजीच्या ट्रक मधून गुंड अरविंद त्रिवेदी नाशिकहून ठाण्याला आपल्या नातेवाईकांकडे आला होता.
ठाणे 13 जुलै: ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केलेला विकास दुबेचा (Vikas Dube) गुंड अरविंद त्रिवेदी याला आता एन्काउंटरची भीती वाटते आहे. ठाणे पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) स्वाधीन केलं आहे. त्याआधी त्याने कोर्टात विनंती केली की त्याला रस्तामार्गेने नाही तर विमानाने उत्तर प्रदेशात घेऊन जावं. कोर्टाने ती विनंती मान्य केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस आता अटक केलेल्या दोनही गुंडांना कानपूरला विमानाने घेऊन जाणार आहेत.
महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून विकास दुबेचा उजवा हात अरविंद त्रिवेदीला अटक केली होती. आज उत्तर प्रदेश एसटीएफ या दोघांचा ताबा घेण्याकरता आली होती. त्यानुसार त्यांना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
युपी पोलिसांनी यमसदनी धाडलेल्या विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद त्रिवेदी हा भाजीच्या गाडीत बसून ठाण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे विकास आणि अरविंद दोघे एकत्रित उज्जैनला पळाले होते मात्र त्यानंतर अरविंदने आपला वेगळा मार्ग निवडत मिळेल त्या गाडीने उलट सुलट प्रवास करत ठाण्याला पोहोचला होता.
पुण्यात 'ई-पास'चा काळाबाजार! भामट्यानं चक्क फेसबूकवर केली जाहिरात
उज्जैन ते राजस्थान, राजस्थानहून पुण्याला, पुण्याहून नाशिकला आणि शेवटी भाजीच्या ट्रक मधून गुंड अरविंद त्रिवेदी नाशिकहून ठाण्याला आपल्या नातेवाईकांकडे आला होता. ठाण्याच्या कोलशेत येथे जाधववाडीत अरविंद त्रिवेदीचे नातेवाईक राहत होते त्यांच्याकडे तो आला होता.
पण, अरविंद इथे येताच काही तासात त्याची माहिती एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचून अरविंदला त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीसह अटक केली. ठाण्याहून देखील अरविंद तिवारी पळण्याच्या तयारीत होता मात्र त्याआधीच दया नायक यांनी त्याला अटक केली.
सोलापूर हादरलं! हॉटेल मॅनेजरचा वस्तादकडून खून; डोक्यात घातला भला मोठा दगड
अरविंद त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांना ठाणे न्यालयात हजर केले असता उत्तर प्रदेश पोलीस या दोघांनाही ताब्यात घेण्याकरता आले होते. त्या आधी या दोघांची ठाणे न्यायालयाने 21 जुलैपर्यंत तळोजा जेलमध्ये रवानगी केली होती. उत्तर प्रदेश पोलीस येताच या दोघांना त्यांच्या हवाली केले केलं गेलं आहे. मंगवारी दोघांनीही मुंबईतून कानपूरला विमानाने घेऊन जाणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.