धक्कादायक! पाळणाघरातल्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर सिक्युरिटी गार्डने केला बलात्कार

माणुसकीला आणि विश्वासाला काळिमा फासणारी घटना ठाणे शहरात घडली आहे. बँकेच्या ATM मशीनध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या माणसानेच चिमुरडीवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 03:21 PM IST

धक्कादायक! पाळणाघरातल्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर सिक्युरिटी गार्डने केला बलात्कार

ठाणे, 2 ऑक्टोबर : माणुसकीला आणि विश्वासाला काळिमा फासणारी घटना ठाणे शहरात घडली आहे. बँकेच्या ATM मशीनध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या माणसानेच चिमुरडीवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. ही चार वर्षांची मुलगी पाळणाघरात creche असताना या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. दशरथ कांबळे या 42 वर्षांच्या सुरक्षा रक्षकानेच हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. सकाळी या मुलीच्या आईने तिला नेहमीच्या पाळणाघरात (Creche)नेऊन सोडलं आणि ती कामाला गेली.

दशरथ कांबळे तिथून जवळच असलेल्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असे. तो पाळणाघरात आला आणि या मुलीला बरोबर घेऊन गेला. तिला गंमत दाखवतो, काही नवं शिकवतो असं सांगून त्यानं तिला आपल्याबरोबर यायला सांगितलं. ती मुलगी कांबळेच्या मागे गेली तेव्हा त्यानं तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला.

वाचा - उमेदवारी नाकारलेल्या भाजप कार्यकर्त्याचा संताप, पोस्टरवर लिहिलं...!

चार वर्षांची चिमुरडी संध्याकाळी आईबरोबर घरी गेली, तेव्हा घाबरलेली होती. आईला तिच्या वागण्यात बदल जाणवला. तिने तिच्याकडे नीट चौकशी केली तेव्हा त्या मुलीने घडलेला प्रसंग सांगितला. आईने तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. ठाणे पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली. पुढचा तपास पोलीस करत आहेत. पण या घटनेमुळे ठाण्याच्या यशोधन नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

--------------------------------------------------------

Loading...

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 03:21 PM IST

ताज्या बातम्या