ठाणे, 14 फेब्रुवारी : दारूचं व्यसन (alcohol addiction) किती घातक असतं ते वारंवार सिद्ध झालं आहे. दारूचं व्यसन माणसाला हिंसेला (violence) प्रवृत्त करत असतं. अशीच टोकाची हिंसा एका माणसानं दारूला पैसे न मिळाल्याच्या किरकोळ कारणानं केली आहे. ठाण्यासारख्या (thane) भागात झालेल्या या घटनेची चर्चा आसपासच्या नागरिकांमध्ये (citizens) होत आहे.
रक्ताच्या नात्यातली माणसंही व्यसन टोकाला गेल्यानंतर शत्रू वाटू लागतात. केवळ दारू आणि त्यापुढं काहीच दिसत नाही असं चित्र निर्माण होतं. उच्चशिक्षित माणसंही यापासून वाचू शकत नाहीत. एका धक्कादायक घटनेत एका व्यक्तीनं आपल्या मोठ्या भावाचा (elder brother) कथितपणे खून केला. भावानं दारू (liquor) पिण्यासाठी पैसे देण्यास (refused to give money) नकार दिल्यानं त्यानं हे कृत्य केलं. ठाणे शहराच्या वागळे इस्टेटमध्ये (Wagle estate) हा प्रकार घडला. शनिवारी घडलेल्या या विचित्र प्रकारानं आसपासच्या नागरिकांमध्ये (citizens) भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मोठ्या भावानं दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या व्यक्तीनं एका मोठ्या दगडानं (stone attack) त्या व्यक्तीच्या डोक्यावर वार केला. संतापाच्या भरात त्यानं हे कृत्य केलं. खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यानं या भावाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. काही लोकांनीच याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह (dead body)ताब्यात घेतला. पोलिसांनी आवश्यक कारवाईनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी (postmortem)पाठवला आहे.
हेही वाचा दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाचा बापाने केला खून, झटापटीत चाकू खुपसला पोटात
आयपीसी (302) अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यांनी आसपासच्या नागरिकांकडे झालेल्या प्रकाराबाबत विचारणाही केली आहे.