मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Drug case मध्ये अडकला 'भल्लालदेव'; राणा दग्गुबाती, रकुलप्रीत सिंहची आता चौकशी

Drug case मध्ये अडकला 'भल्लालदेव'; राणा दग्गुबाती, रकुलप्रीत सिंहची आता चौकशी

राणा दग्गुबाती (Rana daggubati), रकुलप्रीत सिंहसह (Rakulpreet singh) आणखी 10 कलाकारांची ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार आहे.

  • Published by:  Priya Lad

हैदराबाद,  25ऑगस्ट : सेलिब्रिटींचं ड्रग्ज प्रकरण (Celebrity drug case) आता पुन्हा चर्चेत आलं आहे. बाहुबली (Bahubali) फिल्ममधील भल्लालदेव (Bhallaldev) म्हणजे अभिनेता राणा दग्गुबातीला (Rana daggubati) ईडीने समन्स बजावला आहे. राणासह अभिनेत्री रकुलप्रीत सिंह (Rakulpreet singh) आणि आणखी 10 कलाकारांचीही चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे चार वर्षांपूर्वीचं ड्रग्ज प्रकरण आहे. 2017 साली तेलंगाणा उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होते.  यानंतर 12 प्रकरणं नोंदवण्यात आली. आता ईडीने या प्रकरणा मनी लाँड्रिंगबाबत कारवाई सुरू केली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा उत्पादन शुल्क विभागामार्फत जवळपास 12 प्रकरणांची नोंद आहे आणि 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. बहुतेक ड्रग्ज तस्करांचा यात समावेश आहे. आम्ही उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं आहे. तसंच टॉलीवूड सेलिब्रिटीही पुरावे सापडेपर्यंत साक्षीदारच असतील.

हे वाचा - आमिर-किरणच्या घटस्फोटावर भाऊ फैजल खानची आश्चर्यकारक प्रतिक्रिया, म्हणाला...

मिळालेल्या माहितीनुसार ईडीने राणा दग्गुबाती आणि रकुलप्रीत सिंहला या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. रकुलप्रीत सिंहला 6 सप्टेंबर, राणा दग्गुबातीला 8  सप्टेंबर आणि रवी तेजाला 9 सप्टेंबरला बोलावण्यात आलं आहे. याशिवाय चरमी कौर, नवदीप, मुमैथ खान, नंदू, तरुण, तनीष आणि रवीचा ड्रायव्हर यांनाही समन्स बजावण्यात आला आहे.

First published:

Tags: Drug case, Entertainment, Telangana, Tollywood