हैदराबाद, 07 मार्च : हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडाच्या प्रकरणानंतर अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्या. आता तेलंगणातील वानापार्थी इथं एका शाळेत अनेक लहान मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. विद्यार्थीनींवर शिक्षकानेच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
एका खाजगी शाळेतील शिक्षकाला 11 लहान मुलींवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं आहे. सर्व पीडित मुली चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या आहेत. यामधील काही विद्यार्थीनींवर शाळेच्या परिसरातच बलात्कार करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे वय 26 वर्ष असून 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या पालकांनी तक्रार केली. त्यानंतर कलम 376 पॉक्सो अॅक्ट अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलींपैकी काही मुलींवर शाळेच्या परिसरातच बलात्कार केला. तर काहींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले आहेत. काही मुलींसोबत शिकवणीच्या वेळीच गैरवर्तन केलं आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाला जबर मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
#NewsAlert | Telangana Rape Horror: Telangana school teacher arrested.
The 27-year-old teacher has been accused of raping 11 minors in 2 years.
The villagers ransacked the school and beat up the teacher.@RishikaSadam with details pic.twitter.com/ppMGQRJjtd
— News18 (@CNNnews18) March 7, 2020
पोलिस उपअधीक्षक किरण कुमार यांनी सांगितले की, दोन मुलींपैकी एका मुलीने जास्त रक्तस्राव होत असल्याचं पालकांना सांगितल्यानंतर ही गोष्ट समोर आली. मुलीला विचारण्यात आल्यानंतर शिक्षकाने केलेल्या कृत्यांचा पाढाच तिने वाचला. त्यानंतर आणखी एका मुलीकडून माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. शेवटी एकूण 11 मुलींकडून बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.
हे वाचा : 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, असं आलं आईच्या लक्षात