मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

फार्म हाऊसमध्ये 13 महिलांसह तहसीलदार अन् इन्स्पेक्टर; छापेमारीत धक्कादायक माहिती उघड

फार्म हाऊसमध्ये 13 महिलांसह तहसीलदार अन् इन्स्पेक्टर; छापेमारीत धक्कादायक माहिती उघड

पोलिसांना पाहताच तेथे खळबळ उडाली.

पोलिसांना पाहताच तेथे खळबळ उडाली.

पोलिसांना पाहताच तेथे खळबळ उडाली.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपुर, 21 ऑगस्ट : राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील जयसिंहपुरा खोर पोलीस ठाणे हद्दीतील फार्म हाउसमध्ये चक्क कसिनो सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

येथे पोलीस इन्स्पेक्टर आणि तहसीलदारसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती महिलांसह जुगार आणि दारूची पार्टी करण्यात दंग होते. दारूच्या नशेत डीजेच्या तालावर डान्स सुरू होता. पोलीस कमिश्नरेट यांना याबाबत कळताच तातडीने स्पेशन टीम घटनास्थळी पोहोचले. यात कारवाई केल्यानंतर फार्म हाऊसमधून 13 महिलांसह 70 जणांना अटक करण्यात आली आहे.

5 टेबलांवर सुरू होता कसिनो, 23 लाख केले जप्त...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सूत्रांनी याबाबत सूचना दिली होती. जयसिंहपुरा खोरमध्ये एका फार्म हाऊसमध्ये कसिनोवर जुगार खेळला जात होता. दारू पार्टीसह लोक डीजेच्या तालावर नाचत होते. यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाहून 70 जणांना अटक केली. ज्यात 13 महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कसिनो ऑनलाइन पाच टेबलांवर सुरू होता. पोलिसांनी तेथून 23 लाख रुपये जप्त केले आहेत.

भंगार अन् स्टील व्यावसायिकांची चलाखी उघड; IT रेडमध्ये मोठं घबाड जप्त, GST अधिकाऱ्यांकडून टीप

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे पार्टीचा माहोल होता. मात्र पोलिसांना पाहताच खळबळ उडाली. लोक इकडे-तिकडे पळू लागले. मात्र पोलिसांच्या मोठ्या सीएसटी टीमने सर्वांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळाहून दारूच्या बाटल्यांचा ढीग लागला होता आणि लोक दारूच्या नशेत होते.

अनेक प्रसिद्ध लोकांचाही समावेश...

पोलिसांच्या रेडमध्ये अनेक नामांकित लोकांना पकडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये हैद्राबादचा एक इन्स्पेक्टर आणि तहसीलदारशिवाय अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. अद्याप पोलिसांनी सर्व नावांचा खुलासा केलेला नाही. या पार्टीमध्ये बाहेरून आलेल्या लोकांचा समावेश आहे.

First published:

Tags: Crime news, Rajasthan