Home /News /crime /

हृदयद्रावक! बर्थडे पार्टीसाठी पैसे न मिळाल्यानं मुलानं उचललं टोकाचं पाऊल; बचावासाठी वडिलही गेले अन्...

हृदयद्रावक! बर्थडे पार्टीसाठी पैसे न मिळाल्यानं मुलानं उचललं टोकाचं पाऊल; बचावासाठी वडिलही गेले अन्...

वडिलांनी वाढदिवस साजरा (Birthday Party) करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं मुलानं नदीत उडी घेतल्याची (Teenager Jumps into River) धक्कादायक घटना समोर आली आहे. यापाठोपाठ वडिलांनीही मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली

    लखनऊ 04 जुलै : वडिलांनी वाढदिवस साजरा (Birthday Party) करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं मुलानं नदीत उडी घेतल्याची (Teenager Jumps into River) धक्कादायक घटना समोर आली आहे. यापाठोपाठ वडिलांनीही मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, मुलाचा काहीही पत्ता लागला नाही. बुडायला लागलेल्या वडिलांना नावेतून जात असलेल्या काही लोकांनी वाचवलं. मात्र, मुलगा अजूनही बेपत्ता आहे. एनडीआरएफची (NDRF) टीम आणि पोलीस (Police) सध्या या मुलाचा शोध घेत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील आहे. वाराणसीच्या आदमपुर ठाण्याच्या क्षेत्रात जनरल स्टोर चालवणाऱ्या मनोज केसरी यांचा मुलगा अश्वनी केसरी यानं केवळ या कारणामुळे गंगा नदीत उडी घेतली कारण घरच्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला पैसे दिले नाहीत. त्यानं शनिवारी घरच्यांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती. नाराज होऊन अश्वनी घरातून बाहेर पडून राजघाट पुलापर्यंत पोहोचला, त्याचे वडील मनोजदेखील त्याच्या मागे आले. मात्र, त्यांनी त्याला काही समजावून सांगण्याआधीच मुलानं नदीत उडी घेतली. हे पाहून मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनीही नदीत उडी घेतली. नाविकांनी मनोज यांचा जीव वाचवला मात्र त्यांचा मुलाचा शोध लागला नाही. तरुणानं अल्पवयीन प्रेयसीची केली हत्या, व्हिडिओ शेअर करत सांगतिलं धक्कादायक कारण तात्काळ मनोज केसरी यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, काही वेळानंतर शुद्धीवर येताच ते आपल्या मुलाबद्दल विचारू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफच्या टीमनंही अश्वनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. पुण्यात MPSCची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची थक्क करणारी सुसाईड नोट पोलिसांनी याबाबत माहिती देताना म्हटलं, की एनडीआरएफच्या मदतीनं अश्वनीचा शोध घेण्यात आला मात्र अद्याप त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. पुढेही त्याचा शोध सुरू राहील. या घटनेबाबत ठाण्यात सूचनाही दाखल करण्यात आली आहे. मात्र, अश्वनीचा अजूनही शोध न लागल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Birthday celebration, Suicide news

    पुढील बातम्या