मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दुसऱ्याच्या बेडरुमधील खासगी क्षण पाहण्यासाठी ‘त्याने’ केले 200 CCTV हॅक!

दुसऱ्याच्या बेडरुमधील खासगी क्षण पाहण्यासाठी ‘त्याने’ केले 200 CCTV हॅक!

दुसऱ्यांच्या आयुष्यातील खासगी क्षण चोरुन पाहणे किंवा त्याचं चित्रीकरण करणे ही एक विकृती आहे. सिक्युरिटी अलार्म (security alarm) पुरवणाऱ्या कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्यानं या विकृतीचं नवं टोकं गाठलं.

    टेक्सास, 24 जानेवारी :  दुसऱ्यांच्या आयुष्यातील खासगी क्षण चोरुन पाहणे किंवा त्याचं चित्रीकरण करणे ही एक विकृती आहे. सिक्युरिटी अलार्म (security alarm) पुरवणाऱ्या कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्यानं या विकृतीचं नवं टोकं गाठलं. त्याने तब्बल 200 घरांमधील CCTV हॅक केले होते. इतरांच्या बेडरुममधील खासगी क्षण पाहण्यासाठी त्यानं हे कृत्य केलं होतं, असं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे. या प्रकरणामुळे घरातील CCTV फुटेजच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काय आहे प्रकरण? अमेरिकेतील (U.S.) टेक्सास (Texas) मधील हा सर्व धक्कादायक प्रकरण आहे. टेलिस्फोरो एविल्स असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो ऑफिस आणि घरांमध्ये सिक्युरिटी अलार्म पुरवणाऱ्या कंपनीमध्ये कामाला होता. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. एविल्स ग्राहकांच्या प्रोफाईलला स्वत:चा ईमेल आयडी जोडत असे. त्याच्या माध्यमातून तो ग्राहकांचे CCTV हॅक करत असे आणि त्यांचे खासगी क्षण पाहत असे. सिस्टम चेक करण्याच्या निमित्तानं ईमेल आयडी जोडणे आवश्यक असल्याचं त्यानं काही ग्राहकांना सांगितलं होतं. तर काही ठिकाणी त्यानं ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता त्यांच्या प्रोफाईलला स्वत:चा ईमेल जोडला होता. 35 वर्षांच्या एविल्सनं आजवर 9600 वेळा ग्राहकांचं प्रोफाईल हॅक केल्याचं मान्य केलं आहे. तो सुंदर महिलांवर हेरगिरी देखील करत असे. त्याच्याकडं सुंदर महिलांची लिस्ट तयार होती. त्या लिस्टमधील ग्राहकांचे CCTV त्यानं प्रामुख्यानं हॅक केले होते. एविल्स गेल्या साडेचार वर्षांपासून हे कृत्य करत होता, अशी कबुली त्यानं पोलिसांच्या तपासामध्ये दिली आहे. या प्रकरणात त्याची आता चौकशी सुरु आहे. एविल्सवरील सर्व गुन्हे सिद्ध झाले तर त्याला पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Crime news

    पुढील बातम्या