शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यावर जबरदस्ती करत केला विवाह, पुढे विधवा होण्याचंही केलं नाटक; पण का?
शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यावर जबरदस्ती करत केला विवाह, पुढे विधवा होण्याचंही केलं नाटक; पण का?
शिक्षिकेनं तेरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत जबरदस्तीनं विवाह (Teacher Ties Knot With Minor Student) केल्याची बातमी समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळे तिनं हे कृत्य केलं.
जालंधर 18 मार्च : जालंधरमध्ये एका शाळेतील शिक्षिकेनं तेरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत जबरदस्तीनं विवाह (Teacher Ties Knot With Minor Student) केल्याची बातमी समोर आली आहे. शहरातील बस्ती बावा परिसरात झालेल्या या घटनेबद्दल असं सांगितलं जात आहे, की या शिक्षिकेचं अनेक दिवसांपासून लग्न जमत नव्हतं. याच दरम्यान अंधश्रद्धेमुळे तिनं हे कृत्य केलं. तिला असं वाटतं होतं, की हे सगळं केल्यास तिच्यातील दोष दूर होतील. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांना या शिक्षिकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार, शिक्षिकेनं विद्यार्थ्याला ट्यूशनचं आमिष दाखवत सहा दिवस आपल्या घरी थांबवून घेतलं आणि त्याच्यासोबत लग्न केलं. हे लग्न केवळ प्रतिकात्मक होतं. या विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती चांगली नाही. याचाच फायदा घेत शिक्षिकेनं ट्यूशनचं आमिष देत विद्यार्थ्याला काही दिवस आपल्या घरी पाठवण्यास सांगितलं. विद्यार्थ्याच्या घरचे लोक यासाठी तयार झाले.
पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीत असं म्हटलं गेलं, की विद्यार्थ्याला जबरदस्ती सहा दिवस घरात ठेवण्यात आलं. यानंतर त्याच्यासोबत लग्न करुन शिक्षिकेनं हळदी आणि मेहंदीचंदेखील आयोजन केलं, यानंतर पहिल्या रात्रीचं नाटकही रचलं. यानंतर पंडीताच्या म्हणण्यानुसार, विधवा झाल्याचं नाटक केलं. इतकंच नाही तर यानंतर शोक सभेचं आयोजनही केलं. हे सर्व झाल्यानंतर तिनं विद्यार्थ्याला त्याच्या घरी पाठवलं. मुलाचा असा आरोप आहे, की शिक्षिकेनं आणि तिच्या घरच्या लोकांनी त्याच्याकडून कामंही करुन घेतली. या विद्यार्थ्यानं घरी आल्यानंतर कुटुबीयांना याबाबतची माहिती दिली.
हे सर्व समजल्यानंतर मुलाच्या घरच्यांनी बस्ती बावा खेल पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी शिक्षिका आणि तिला सल्ला देणारा पंडित पोलीस ठाण्यात पोहोचले आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या घरच्यांनीही केस मागे घेतली. मात्र, याबद्दलची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले. जालंधरचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी सांगितलं, की ही घटना खरच घडली आहे आणि याप्रकरणाचा तपास सुरू आहे. हे लग्न प्रतिकात्मक असलं तरीही अल्पवयीन मुलासोबत अशाप्रकारे विवाह करणं चुकीचं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.