Home /News /crime /

Online Class दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत झाला वाद; शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Online Class दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत झाला वाद; शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

या बातमीमुळे शाळेत खळबळ उडाली आहे.

    केरळ, 15 ऑगस्ट : केरळमध्ये (Keral News) एका शाळेच्या शिक्षकाने (School Teacher Suicide) आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आवं आहे. या बातमीमुळे शाळेत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकावर काही दिवसांपूर्वी एक हल्ला झाला होता. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतर 44 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. शिक्षकाचे मित्र आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या चुकीच्या वागणुकाला जबाबदार ठरवलं आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा त्यांनी दावा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, मृत सुरेश चलियथ यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाचं त्याच्या विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद झाला होता. मात्र त्यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार केली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. हे ही वाचा-Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव शिक्षकाच्या मित्राने सांगितला घडलेला प्रकार शिक्षकाच्या मित्राने सांगितलं की, काही लोक गुरुवारी सुरेशच्या घरी आले होते. तेव्हा सुरेश घरी नव्हता. त्यांना फोन करून बोलवण्यात आलं. जसा सुरेश घरी पोहोचला, लोकांनी त्याला मारहाण सुरू केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ऑनलाइन क्लासदरम्यान एका विद्यार्थ्याच्या आईसोबत सुरेशचा वाद झाला होता. घरात हल्ला केलेल्यांनी सुरेशला त्याबाबत इशारा दिला. सुरेशच्या मित्राने पुढे सांगितलं की, सुरेशला ते लोक घसरत गाडीपर्यंत घेऊन गेले. आणि त्याला निर्जनस्थळी सोडून आले. या प्रकरणात सुरेशने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, मात्र याबाबतचा गुन्हा दाखल केला नसल्याचं शिक्षकाच्या मित्राने सांगितलं
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Kerala, School teacher, Suicide

    पुढील बातम्या