मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शिक्षकाने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार, पिंपरीतील 11 वी घटना

शिक्षकाने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार, पिंपरीतील 11 वी घटना

पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या नराधमाने आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केले

पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या नराधमाने आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केले

पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या नराधमाने आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केले

पिंपरी चिंचवड, 31 मार्च : पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri chinchvad ) बाललैंगिक अत्याचाराच्या (Child sexual abuse) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पेशाने शिक्षक (techer) असलेल्या एका तरुणाने आपल्याच नात्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फटके देण्याची धमकी देत  शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या नराधमाने आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केले आहे. आरोपी ही पीडितेच्या आते  भाऊ आहे. आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेतो.  पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अश्लिल कृत्य केले.

(मृत्यूपूर्वी माणसांना नेमकं काय दिसतं? 'या' नर्सने सांगितला अनुभव...)

या घटनेमुळे पीडिता भयभीत झाली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.   या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मागील 20 दिवसांत 11 अत्याचाराच्या घटना

धक्कादायक म्हणजे, मागील वीस दिवसातील बाल लैंगिक अत्याचाराची ही घटना असल्याने घरी राहणाऱ्या आणि एकल राहणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

(आलिया भट्टपूर्वी 'या'अभिनेत्रींना मिळाली होती RRRची ऑफर,LIST वाचून वाटेल आश्चर्य)

वेगवेगळ्या 11 घटनांमध्ये तीन घटनात वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तर इतर घटकांमध्ये ओळखीच्या व्यक्तीने शेजाऱ्याने, सोशल मीडियावर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घडल्या आहेत.

First published: