Home /News /crime /

निवृत्तीनंतर शिक्षकाची FB पोस्ट; विद्यार्थिनीने कमेंट केली अन् 30 वर्षांचं घृणास्पद कृत्य उघड

निवृत्तीनंतर शिक्षकाची FB पोस्ट; विद्यार्थिनीने कमेंट केली अन् 30 वर्षांचं घृणास्पद कृत्य उघड

परिस्थिती इतकी बिघडली की शिक्षकाला पळ काढावा लागला. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

    केरळ, 14 मे : मंगळवारी एका रिटायर्ड टीचर आणि माकपा (CPIM) नेता केवी शशिकुमार (KV Sasikumar) यांच्या विरोधात मलप्पुरममधील (Keral News) वनिता पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीपीआयच्या (M) नगरसेवकावर आता अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण (molesting) केल्याचा आरोप केला आहे. 60 हून अधिक मुलींनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी गेल्या 30 वर्षांपासून हे घृणास्पद कृत्य करीत होता. पोलिसांनी शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. asianet न्यूज ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सरकारने दिले तपासाचे आदेश... अल्पवयीन मुलींच्या तक्रारीनंतर पोस्कोअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यानंतर अन्य मुलींनीही त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. शिक्षकामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने माकपाने आरोपीचं सदस्यत्व रद्द केलं आहे. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल केल्यानंतर शशीकुमार फरार झाला होता, अशी माहिती समोर आली होती.  शेवटी त्याला ताब्यात घेण्यात आलं. केरळच्या शिक्षण मंत्र्यांनाही या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. हे ही वाचा-'एखाद्याला 'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळाप्रमाणेच गंभीर गुन्हा', कोर्टाचा निकाल फेसबुक पोस्टवर केलेल्या कमेंटनंतर झाला खुलासा... मलप्पुरम महिला पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर शशीकुमार फरार झाला. पोलिसांनी एका आठवड्यानंतर त्यांना अटक केली. मलप्पूरमचे नगरसेवक केवी शशीकुमार यांनी मार्च 2022 मध्ये सेंट गेमास गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधून रिटायर्डनंतर फेसबुकवर अंतिम दिवसाची पोस्ट केली होती. या पोस्टवर शाळेच्या माजी विद्यार्थिनीने #Metoo अशी कमेंट केली. यानंतर अनेक मुलींनी शिक्षकाची पोल खोल केली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Kerala

    पुढील बातम्या