मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /डॉक्टरचा प्रताप! फ्रॅक्चर नसतानाही हिप रिप्लेसमेंट केल्याचा प्रसिद्ध लेखिकेचा आरोप

डॉक्टरचा प्रताप! फ्रॅक्चर नसतानाही हिप रिप्लेसमेंट केल्याचा प्रसिद्ध लेखिकेचा आरोप

फ्रक्चर नसतानाही हिप रिप्लेसमेंट केल्याचा प्रसिद्ध लेखिकेचा आरोप

फ्रक्चर नसतानाही हिप रिप्लेसमेंट केल्याचा प्रसिद्ध लेखिकेचा आरोप

प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी फ्रॅक्चर नसताना हॉस्पिटलने हिप रिप्लेसमेंट केल्याचा आरोप केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 31 जानेवारी : फ्रॅक्चर झाले नसतानाही संपूर्ण हिप रिप्लेसमेंट केल्याचा धक्कादायक आरोप प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अपोलो हॉस्पिटलवर केला आहे. नसरीन यांनी मंगळवारी ट्विट करून दावा केला की त्यांना फ्रॅक्चर झाले नसतानाही हॉस्पिटलने 'बळजबरीने' शस्त्रक्रिया केली. मात्र, अपोलो हॉस्पिटलने हे आरोप फेटाळून लावले. लेखिकेच्या परवानगीनंतरच ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यासाठी त्यांची अधिकृत संमतीही घेण्यात आली, असे सांगितले.

वास्तविक तस्लिमा नसरीन यांनी एकामागून एक अनेक ट्विटमध्ये सांगितले की, 'त्या गुडघेदुखीसाठी रुग्णालयात गेल्या होत्या. मात्र, हिप फ्रॅक्चर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी लिहिले की, 'गुडघेदुखीमुळे मी अपोलोला गेले होते. डॉ. यतींद्र खरबंदा यांनी मला सांगितले की माझे हिप फ्रॅक्चर झाले आहे. मात्र, त्यांनी मला एक्स-रे/सीटी दाखवले नाही. मला 13 जानेवारी रोजी रात्री उशिरा उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, 14 जानेवारीच्या सकाळी त्यांनी मला संपूर्ण हिप बदलण्याची सक्ती केली. त्यानंतर कोणतेही हिप फ्रॅक्चर आढळले नाही आणि चुकीचा डिस्चार्ज समरी तयार केली गेली.

तस्लिमा नसरीन यांनी सांगितलं की  हा एक भयानक अनुभव

या अनुभवाना त्यांनी 'दुःस्वप्न' असल्याचे म्हटले आहे. नसलेल्या आजारावर उपचार करण्याच्या नावाखाली तिच्या शरीरातील निरोगी भाग काढून टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “आपलं अपंगत्व विकत घेण्यासाठी” त्यांनी 7,42,845 रुपये दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्या लिहितात की, 'मी निरोगी आणि तंदुरुस्त होते, 1 जानेवारीला धावत होते. डॉ. खरबंदा यांच्या चुकीच्या उपचारामुळे 31 जानेवारीला मला चालताही येत नाही.

वाचा - आसुमलपासून आसाराम बनण्याची कहाणी; चायवाला ते बाबा असा प्रवास; कधीकाळी दारुही..

अपोलो रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावले

त्याचवेळी अपोलो हॉस्पिटलने तस्लिमा नसरीन यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, “रुग्णाने खाली पडल्याची तक्रार नोंदवली होती, ज्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. या क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या सक्षम आणि अनुभवी सर्जनने विहित निदान आणि वर्क अप टूल्स वापरून स्थितीचे निदान केले."

अपोलो हॉस्पिटलने असेही सांगितले की नसरीन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय स्थिती आणि वय लक्षात घेऊन हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची शिफारस केली होती. रुग्णालयाने सांगितले की, 'यासाठी रुग्णाची परवानगी आणि औपचारिक संमती घेण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि रुग्णाला प्रोटोकॉलनुसार डिस्चार्ज देण्यात आला.

अपोलो रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नसरीन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पूर्ण बरे होण्यासाठी फिजिओथेरपीसह विविध सल्ल्यांचे पालन करण्यास सांगितले होते. अधिकारी म्हणाले, 'दुर्दैवाने त्याचे पालन होत नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरावा-आधारित प्रोटोकॉलनुसार उपचार सल्ल्याचे पालन करणे सुरू ठेवण्यासाठी आम्ही त्याला आग्रहीपणे विनंती करतो.'

First published:

Tags: Crime, Delhi