महिलेच्या छातीत 30 तास घुसून राहिला चाकू, डॉक्टरांकडे नेलं आणि...

महिलेच्या छातीत 30 तास घुसून राहिला चाकू, डॉक्टरांकडे नेलं आणि...

महिलेच्या छातीमध्ये भोसकलेला धारधार चाकू डॉक्टरांनी 30 तासानंतर काढला आणि यानंतरही ती महिला जिवंत राहिली. ऐकायला जरी विचित्र वाटत असले, तरी ही घटना घडली आहे.

  • Share this:

कृष्णागिरी, 18 जून : महिलेच्या छातीमध्ये भोसकलेला धारधार चाकू डॉक्टरांनी 30 तासानंतर काढला आणि यानंतरही ती महिला जिवंत राहिली. ऐकायला जरी विचित्र वाटत असले, तरी ही घटना घडली आहे. तामिळनाडूमधील कृष्णागिरी जिल्हात ही घटना घडली. कोयंबटूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल याठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांची ही कमाल आहे. एका 40 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला झाला होता. यामध्ये सहा इंचाचा चाकू महिलेच्या छातीमध्ये भोसकण्यात आला. 30 तास हा चाकू  तसाच राहुनही महिलेचे प्राण वाचले आहेत.

द हिंदू ने दिलेल्या माहितीनुसार कोयंबटूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिलेची सर्जरी केली. ही घटना घडल्यानंतर महिलेला तिच्या घरच्यांनी जवळच्या सरकारी कुमारमंगलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. रात्रभर ही महिला घरीच होती. त्यानंतर सकाळी तिला या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

(हे वाचा-सरकारी रुग्णालयात राडा, पोलिसांसमोरच रुग्णांची चाकू भोसकून हत्या)

मात्र त्यानंतर तिला कोयंबटोर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता तिला मेडिकल कॉलेज महाविद्यालयात आणण्यात आले. या महिलेवर एका ओळखीतील माणसानेच हल्ला केल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

(हे वाचा-पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगमधील बड्या अधिकाऱ्यासह पत्नी आणि मुलांवर गुन्हा)

कोयंबटूर हॉस्पिटल के कार्डिओथोरेसिक सर्जरी डिपार्टमेंटचे हेड डॉ. ई. श्रीनिवासन आणि अॅनेस्थिओलॉजीचे हेड डॉक्टर जयशंकर नारायण यांनी मिळून ऑपरेशन लीड केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चाकू 6 इंचापेक्षा जास्त लांब होता. यामुळे फुप्फुसांच्या काही हिश्शाला इजा पोहोचली होती. सुदैवाने हा चाकू महिलेच्या हृदयाजवळ गेला नव्हता, त्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे. काही दिवसांनंतर या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या तिच्यावरचा धोका टळला आहे.

First published: June 18, 2020, 5:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या