बदला घेण्यासाठी TV अभिनेत्याची हत्या, पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप; घटना CCTVमध्ये कैद

बदला घेण्यासाठी TV अभिनेत्याची हत्या, पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप; घटना CCTVमध्ये कैद

एका प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेत खलनायकाचे काम करणाऱ्या अभिनेत्याची प्रेमसंबंधाच्या संशयातून हत्या झाल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

चेन्नई, 18 नोव्हेंबर: देशभरातील मनोरंजन विश्वासाठी 2020 हे वर्ष धक्कादायक ठरले आहे. अनेक दु:खद घटना यावर्षी मनोरंजन विश्वातून समोर येत आहेत. तमिळ भाषेतील प्रसिद्ध मालिका थेनमोझी बीए (Thenmozhi BA) मध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सेल्वाराथिनम (Selvarathinam) याची चेन्नईमध्ये हत्या झाली आहे. या घटनेदरम्यानचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये 4 संशयास्पद व्यक्ती आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार रविवारी अभिनेत्याला सातत्याने फोन येत होते, त्यामुळे तो घराबाहेर पडला.

या मीडिया अहवालानुसार एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, शनिवारी सेल्वारिथम सेटवर शूटिंगसाठी गेला नव्हता. तो त्याचा साहाय्यक दिग्दर्शक असणारा मित्र मणी याच्याबरोबर होता. रविवारी सकाळी त्याला फोन कॉल आला त्यानंतर तो घराबाहेर गेला. काही वेळाने त्याच्या रुममेटला असे कळले की, त्याची हत्या झाली आहे. मणीनेच या घटनेविषयी पोलिसांना कळवले होते. घटनास्थळी एमजीआर पोलीस दाखल झाले होते, त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून संशयितांचा तपास सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार सेल्वारिथमची त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांबरोबर बाचाबाची देखील झाली. सेल्वारिथम श्रीलंकन शरणार्थी होता, तो गेली 10 वर्ष भारतात राहत होता.

(हे वाचा-पुण्यातील ग्रामीण भागात ड्रग्स माफियाला अटक, 54 हजारांचा मुद्देमाल जप्त)

अहवालानुसार सेल्वाराथिनम त्याच्या असिस्टंट डिरेक्टर असणाऱ्या मित्राबरोबर राहत होता. रविवारी त्याला फोन कॉल आल्यानंर त्याने त्या मित्राला असे सांगितले की तो त्याच्या काही दुसऱ्या मित्रांना भेटायला जात आहे. India.com च्या आणखी एका अहवालानुसार, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, त्या हल्लेखोरांपैकी एकाचे नाव विजयकुमार आहे. तसंच सेल्वाराथिनमचे विजयकुमारच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचेही अहलावालात म्हटले आहे. याचा बदला घेण्यासाठीच अभिनेत्याचा  खून करण्यात आला असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 18, 2020, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading