Home /News /crime /

तळोजा : इमारतीच्या बांधकामावेळी लिफ्ट पडल्याने 4 कामगारांचा दुर्देवी मृत्यू, एक गंभीर

तळोजा : इमारतीच्या बांधकामावेळी लिफ्ट पडल्याने 4 कामगारांचा दुर्देवी मृत्यू, एक गंभीर

नवीन इमारतीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.

    तळोजा, 28 जून : तळोजा (Taloja News) येथील शिर्के कॉलनीमध्ये एका इमारतीची लिफ्ट पडल्याने चार कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय एकजण गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जात आहे. त्याच्यावर पनवेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवीन इमारतीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. बांधकाम मटेरियल नेणारी लिफ्ट कोसळल्याने चार कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. लिफ्टजवळ उभे असलेले दोन कामगार तर लिफ्ट खाली गाडीत बसलेले दोन कामगार ठार झाले आहेत. या प्रकरणात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मृतदेह पनवेल रुग्ण्यालयात नेण्यात आले आहेत. तळोजा पोलिसांकडून अधिक तपास सुरू केले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय 40 ते 45 असल्याचे सांगितले जाते. ही घटना संध्याकाळी 5 वाजता घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बातमी अपडेट होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Crime news, Panvel

    पुढील बातम्या