मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कोल्ड्रिंकच्या उधारीवरून केला खून, किरकोळ रकमेसाठी टेलरने चहावाल्याला भोसकले

कोल्ड्रिंकच्या उधारीवरून केला खून, किरकोळ रकमेसाठी टेलरने चहावाल्याला भोसकले

हत्या झालेला चहा विक्रेते रितेश

हत्या झालेला चहा विक्रेते रितेश

कोल्ड्रिंकची (Cold drink) उधारी (money) मागितल्याचा राग आल्यावरून एका टेलरने (tailor) चहाची टपरी चालवणाऱ्या इसमाचा (Tea seller) खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

चंदिगढ, 31 ऑगस्ट : कोल्ड्रिंकची (Cold drink) उधारी (money) मागितल्याचा राग आल्यावरून एका टेलरने (tailor) चहाची टपरी चालवणाऱ्या इसमाचा (Tea seller) खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. आपलं रोजचं चहा विकण्याचं काम करताना या व्यक्तीने दुकानात कोल्ड्रिंकदेखील विकण्यासाठी ठेवले होते. याच परिसरातील एका टेलरकडे कोल्ड्रिंकची उधारी होती. ती मागण्याच्या वेळी झालेल्या वादाची परिणती हत्येत झाली.

असा झाला वाद

हरियाणातील तलई बाजारमध्ये रितेश नावाच्या व्यक्तीचं चहाचं दुकान होतं. चहा विकून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या जवळच राजू नावाच्या एका टेलरचं दुकान होतं. राजू चहा पिण्यासाठी नेहमी रितेशच्या स्टॉलवर येत असे. रितेशने त्याच्या दुकानात कोल्डिंक्सही विक्रीसाठी ठेवले होते. राजूने उधारीवर काही कोल्ड्रिंक्स घेतले होते आणि लवकरच त्याचे पैसे देण्याचं कबूल केलं होतं. हे पैसे मागण्यासाठी रितेश राजूच्या दुकानात गेला. पैसे देण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद आणि बाचाबाची सुरु झाली. राजूनं त्याच्या दुकानातील मोठ्या कात्रीनं रितेशच्या पोटात वार केला. हा वार वर्मी लागल्याने रितेश जागीच कोसळला.

उपचारादरम्यान मृत्यू

जखमी अवस्थेतील रितेशला तिथे उपस्थित लोकांनी हॉस्पिटलमध्ये हलवलं. मात्र उपचारादरम्यान काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. कोल्ड्रिंकच्या किरकोळ उधारीच्या कारणावरून प्रकरण थेट खुनापर्यंत पोहोचल्याचं पाहून आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी अगोदर राजूवर 307 कलमानुसार गुन्हा नोंदवला होता. आता रितेशचा मृत्यू झाल्यानंतर 302 कलामानुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राजू सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच राजूला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

हे वाचा - पाकिस्तानात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात तोडफोड,भक्तांनाही केली मारहाण

पत्नी होती माहेरी

ही घटना घडली तेव्हा रितेशची पत्नी माहेरी गेली होती. रितेशला 5 वर्षांचा मुलगा असून पत्नी आणि मुलाची पूर्ण जबाबदारी रितेशवर होती. आता रितेशचा मृत्यू झाल्यावर कुटुंबावर संकटाची भली मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

First published: