मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुंबईत मध्यरात्री चालली तलवार, तीन जणांवर केले सपासप वार

मुंबईत मध्यरात्री चालली तलवार, तीन जणांवर केले सपासप वार

नंतर अक्षयने काही तरुणांवर आपल्याजवळच्या तलवारीने हल्ला केला. धार धार तलवारीच्या पात्याने तीन जणांना जखमी केली.

नंतर अक्षयने काही तरुणांवर आपल्याजवळच्या तलवारीने हल्ला केला. धार धार तलवारीच्या पात्याने तीन जणांना जखमी केली.

नंतर अक्षयने काही तरुणांवर आपल्याजवळच्या तलवारीने हल्ला केला. धार धार तलवारीच्या पात्याने तीन जणांना जखमी केली.

डोंबिवली 08 मार्च : मुंबईचं महत्त्वाचं उपनगर असलेल्या डोंबिवलीत शनिवारी मध्यरात्री थरारनाट्य घडलं. काही गुंडांमध्ये झालेल्या भांडणात तलवारी निघाल्या. या हल्ल्यात काही तरुणांवर वार झालेत. त्यात तीन जण जखमी झाले असून 1 जण गंभीर जखमी आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत असून टोळी युद्ध किंवा आपसातलं भांडण यातून हा प्रकार घडला आहे का याचा तपास करत आहेत.  या प्रकरणी विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारीमध्यरात्री डोंबिवली पश्चिम भागात रस्त्यावर ही घटना घडली. अक्षय पाटील उर्फ सुब्बी हा काही तरुणांसोबत या भागात आला होता. मध्यरात्री हे सगळे तरुण संशयास्पदपणे फिरत होते. ते कुणाचातरी शोध घेत होतो असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. नंतर अक्षयने काही तरुणांवर आपल्याजवळच्या तलवारीने हल्ला केला. धार धार तलवारीच्या पात्याने तीन जणांना जखमी केली. यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे.

भिवंडी हादरली, बारा तासात दोन जणांची हत्या

आरोपी अक्षय पाटील उर्फ सुब्बी याच्यासह आलेल्या सर्व तरुणांची पार्श्वभूमी हीं गुंडप्रवृत्तीची असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. अक्षय उर्फ सुब्बी हा तडीपार गुंड असल्याची ही माहितीही सूत्रांनी दिलीय. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहितीही पोलीस देत असून नेमकं कारण तपासनंतरच स्पष्ट होऊ शकेल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचा...

धडाकेबाज सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार

गणेश नाईकांना 'कोरोना व्हायरस'चा Brand Ambassador करा; आव्हाडांची खोचक टीका

First published:

Tags: Crime news, Dombivali police