मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आधी विहिरीत ढकलून दिले अन् वरून टाकला दगड, आईने सुपारी देऊन लेकीला संपवले

आधी विहिरीत ढकलून दिले अन् वरून टाकला दगड, आईने सुपारी देऊन लेकीला संपवले

  सैदा 4 ते 5 महिन्याची गर्भवती होती. पती नसताना पोटातील बाळ कुणाचे याबद्दल ती आईलाही काहीच सांगत नव्हती.

सैदा 4 ते 5 महिन्याची गर्भवती होती. पती नसताना पोटातील बाळ कुणाचे याबद्दल ती आईलाही काहीच सांगत नव्हती.

सैदा 4 ते 5 महिन्याची गर्भवती होती. पती नसताना पोटातील बाळ कुणाचे याबद्दल ती आईलाही काहीच सांगत नव्हती.

  • Published by:  sachin Salve

हैदर शेख,प्रतिनिधी

चंद्रपूर, 22 फेब्रुवारी : चंद्रपूरमधील (chandrapur) कवीटपेट परिसरात एका शेतातील विहिरीत अनोळखी महिलेची शव आढळून आले होते. केवळ मृतक महिलेच्या पेहरावावरून ती तेलंगणातील असल्याचा अंदाज घेत या प्रकरणाचा विरुर पोलिसांनी छडा लावला व प्रकरणात आईनेच सुपारी देऊन तिला मारल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतकाचे आईसोबत मुंडीगेट येथील नातेवाईक पती-पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी (chandrapur police) दोन दिवसातच प्रकरणाचा तपास करून आरोपी गजाआड केले आहे.

18 फेब्रुवारी रोजी कवीटपेट परिसरातील अर्जुन आत्राम याचे शेतातील विहिरीत अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आल्याने तिची ओडख पटविण्यासाठी विरुर पोलीस ठाण्याचे पोलीस वर्तमानपत्रे,सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यावरून कोंडापेल्ली -विजयवाडा , तेलंगणा येथून विरुर पोलिसांना फोन आला. तीचे नाव सैदा बदावत असून तेलंगणातील  कोंडापल्ली विजयवाडा येथील असल्याचे सांगितले. तिचा किंवा कुटूंबियाचा शोधात असताना मृतक महिलेच्या आईचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला. तिच्या फोनवर मृतक महिलेचा फोटो पाठवून तिची ओळख पटवून घेतली व खात्री झाल्यानंतर तिला विरुर येथे बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मृतक महिला गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

परराज्यातील महिलेने इकडे येऊन आत्महत्या केली की हत्या हा प्रश्न पोलिसांसमोर  होता. विरुर परिसरातील मुंडीगेट येथील सिन्नू अजमेरा हा तिचा नातेवाईक असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला असता तो हैद्राबादला असल्याचे समजल्याने संपर्क केला. त्याच्या बोलण्यात उडवाउडवीची उत्तर मिळाल्याने पोलिसांना दाट संशय आला. त्याचे फोन कॉल डिटेल्स घेतले असता घटनेच्या दिवशी सिन्नू मुंडीगेट गावात येऊन गेल्याचे समजले. पोलिसांचे एक पथक हैदराबाद येथे गेले व त्यांनी सिन्नूला ताब्यात घेतले.

दरम्यान, मृतक महिलेच्या आईच्या तक्रारीवरून 302, 201 नुसार गुन्हा नोंद केला गेला. सिन्नूला हैद्राबाद वरून आणून विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबुल केला व पूर्ण हकीकत सांगितली. मृतक सैदा हिचे दहा वर्षांपूर्वी या व्यक्तीशी सोबत लग्न झाले होते. तिला 9 वर्षांची एक मुलगी आहे. नंतर ती नवऱ्याला सोडून राहत होती. परंतु ती चारित्र्यहीन कामे करीत असल्याची शंका आईला होती.  सैदा 4 ते 5 महिन्याची गर्भवती होती. पती नसताना पोटातील बाळ कुणाचे याबद्दल ती आईलाही काहीच सांगत नव्हती. समाजात आपली पूर्ण बदनामी होईल या भीतीने सैदाला मारून टाकण्याचे आईने ठरविले. त्यानुसार सैदा व आई दोघेही खम्मम येथे14 फेब्रुवारीला  एका लग्न कार्यक्रमात आले होते. त्या लग्नात सिन्नू व त्याची पत्नी शारदा आले होते. तिथे सैदाच्या आईने आपबीती सांगत 'तुमच्या गावाकडे नेऊन तिला मारून टाकून पुरावा नष्ट करा' असे सांगून 30 हजार रुपये देण्याची कबुल केलं. यासाठी फक्त 5 हजार रुपये घेऊन सैदाला गर्भपात करण्यासाठी आमचे गावात औषधी देतात असा बहाणा करून घेऊन सिन्नू व शारदा मुंडीगेट येथे आले.

दिनांक 18 फेब्रुवारीला मित्राची दुचाकी घेऊन सिन्नू त्याची पत्नी आणि सैदा मिळून औषधी घेण्यासाठी म्हणून गावातून निघाले. कवीटपेट येथील निर्जन स्थळ असलेल्या अर्जुन आत्राम यांचे शेतातील विहिरीजवळ आणले. इथेच औषधी देणार आहे, असे सांगून सैदाला त्या विहिरीतील पाणी काढण्यास सांगितले. ती पाणी काढण्याकरिता खाली वाकली. इतक्यात सिन्नूची पत्नी शारदा हिने सैदाला जोरदार धक्का देत विहिरीत ढकलून दिले. विहिरीत पडल्यानंतरही लवकर मरण्यासाठी मोठा दगड वरून विहिरीत टाकला. परंतु दगड बाजूला पडला तरी पाण्यात पडून सैदाचा मृत्यू झाला. तिथून सिन्नू पत्नी शारदाला घरी सोडून  हैद्राबादला पळून गेला. परंतु पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने या खुनाचा उलगडा केला आणि आरोपींना दोनच दिवसात अटक केली. या कामगिरीबद्दल विरुर पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

First published: