Home /News /crime /

शाळेच्या मुख्याध्यापकांचा संशयास्पद मृत्यू; सकाळी वॉकसाठी पडले होते घराबाहेर, आढळला मृतदेह!

शाळेच्या मुख्याध्यापकांचा संशयास्पद मृत्यू; सकाळी वॉकसाठी पडले होते घराबाहेर, आढळला मृतदेह!

कोरोनामुळे शाळा बंद असल्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याचंही सांगितलं जात आहे.

    चंदीगड, 22 जानेवारी : हरियाणातील (Haryana News) हिसार शहरातील एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांचा मृतदेह सापडल्याने (found dead body of a private school principal) खळबळ उडाली आहे. मृतक 55 वर्षीय वोमेश महतानी पटेल नगरमधील भारत हाय स्कूल चालवित होते. वोमेश महतानी पटेल नगर स्थित आपल्या घरातून सकाळी वॉक करण्यासाठी बाहेर पडले. (Crime News) त्यानंतर ते घरी परतलेच नाही. (Suspicious death of school principal, Had fallen out of the house for a morning walk, found dead) दुपारनंतर वोमेश महतानी यांचा मृतदेह सरसाना मायनरमधील गंगवा गावाजवळी पुलाच्या खाली अडकलेला आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून कारवाई सुरू केली आहे. वोमेश यांनी सुसाइड केली की त्यांची हत्या करण्यात आली किंवा आणखी काही..याबाबत अद्याप तपास सुरू आहे. महतानी यांच्या शरीरावर जखमांचे निशाणही नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे ही वाचा-जीवलग मित्रच झाले एकमेकांचे दुश्मन; एकावर वार, तर दुसऱ्याची गोळ्या झाडून हत्या आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वोमेश महतानी गेल्या अनेक वर्षांपासून पटेल नगरमध्ये एक शाळा चालवित होते. सामाजिक कार्यकर्ते आणि मेहनती असल्या कारणाने परिसरात त्यांच्या शाळेच चांगलं नाव होतं. वोमेश महतानी यांचा मुलगा दुसऱ्या शहरात राहतो. ते आणि त्यांची पत्नी पटेल नगरमध्ये राहतात. सकाळी वोमेश महतानी लोवर आणि निळ्या रंगाचा शर्ट घालून घराबाहेर पडले होते. दुसऱीकडे कोरोनामुळे शाळा बंद असल्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याचंही सांगितलं जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Haryana, School

    पुढील बातम्या