Home /News /crime /

गूढ कायम! तरुणाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड, दुसऱ्या दिवशी संदिग्ध अवस्थेत मृत्यू

गूढ कायम! तरुणाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड, दुसऱ्या दिवशी संदिग्ध अवस्थेत मृत्यू

अल्पवयीन मुलीची एका तरुणाने छेडछाड काढल्याच्या दुसऱ्या (Suspicious death of a minor girl the second day of molestation) दिवशी या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    भोपाळ, 26 सप्टेंबर : अल्पवयीन मुलीची एका तरुणाने छेडछाड काढल्याच्या दुसऱ्या (Suspicious death of a minor girl the second day of molestation) दिवशी या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यात ठिकरी गावात राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदल्या दिवशी झालेली छेडछाड आणि दुसऱ्या दिवशी तरुणीचा झालेला मृत्यू यांचा पोलीस तपास करत आहेत. तरुणाकडून छेडछाड शौचासाठी शेतात गेलेल्या तरुणीची एका 28 वर्षांच्या तरुणाने छेड काढली. 12 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीने त्यानंतर आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांना हाका मारल्या. त्यानंतर छेडछाड करणारा तरूण पळून गेल्याचं या मुलीनं सांगितलं. मात्र त्यानंतर लगेचच तिची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी तिला सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र तिथं डॉक्टर उपस्थित नव्हते. कुटुंबीयांनी डॉक्टरांना फोन केल्यानंतर त्यांनी घरी येऊन औषधं घेऊन जायला सांगितलं. कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या घरून मुलीसाठी औषधं घेतली. मुलीला एक इंजेक्शनही देण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी मुलीची तब्येत अधिकच बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र या दरम्यान मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत न्याय देण्याची मागणी केली. डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्यामुळे आणि चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे वाचा - विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी पोलिसांची मध्यस्थी रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करत कुटुंबीयांना शांत केलं आणि मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. पोस्टमॉर्टेममधील तपशीलांनुसार श्वास थांबल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं, याचा तपास पोलिसांनाही लागलेला नाही. पोलिसांनी या घटनेबाबत तपास सुरू केला असून लवकरच मृत्यूचं कारण शोधलं जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Death, Madhya pradesh

    पुढील बातम्या