Home /News /crime /

थर्टी फस्टच्या पार्टीला गेला अन् परत आलाच नाही, 27 वर्षीय तरुणाच्या मृत्यूमुळे खळबळ

थर्टी फस्टच्या पार्टीला गेला अन् परत आलाच नाही, 27 वर्षीय तरुणाच्या मृत्यूमुळे खळबळ

31 डिसेंबर रोजी पार्टी देतोय म्हणून त्याला ठेकेदाराचा पार्टीसाठी ये म्हणून फोन आला होता.

धुळे, 01 जानेवारी : नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात येत असताना धुळ्यात एका तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना घडली. थर्टी फस्ट पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना धुळे (Dhule) जिल्ह्यात घडली आहे. वडजाई पिंप्री येथे राहणारा गौतम शिरसाठ हा (27 वर्षीय) तरुण बांधकाम क्षेत्रात सेंट्रींगचे काम करतो. 31 डिसेंबर रोजी पार्टी देतोय म्हणून त्याला ठेकेदाराचा पार्टीसाठी ये म्हणून फोन आला होता. यावेळी इतर दोघे मजूर मित्रांसमवेत गौतम मोटार सायकलीने पार्टीसाठी गेला. VIDEO: सेलिब्रेशन वगैरे ठीक आहे पण मास्क कुठेय? नेहा कक्कर झाली ट्रोल मात्र, काही वेळाने गौतमची प्रकृती खराब झाल्याचा कुटुंबीयांना फोन आला.यावेळी गौतमला स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचं सांगत त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी गौतमला मृत घोषित केले. पार्टीसाठी सुस्थितीत गेलेला गौतम अचानक गंभीर झाला कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून गौतमसोबत घातपात झाला असल्याची शंका गौतमच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तर गौतमची अचानक तब्येत बिघडली असल्याचा दावा गौतमच्या मित्रांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना; गँगरेप पीडित महिलेवर तीन गावांनी टाकला बहिष्कार दरम्यान, मोहाडी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्राथमिक पंचनामा करीत गौतमचे पार्थिव शवविच्छेदना साठी पाठविले. शिवाय गौतमला पार्टीचे निमंत्रण देणारा व गौतमला मोटारसायकलवर बसवून घरुन घेवून जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. गौतमच्या शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचे मोहाडी पोलिसांनी म्हटले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Murder, खून, हत्या

पुढील बातम्या