Home /News /crime /

निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मुलीच्या लग्नात दिला सव्वा कोटी हुंडा; आमदार, नेत्यांसमोर पार पडला कार्यक्रम

निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मुलीच्या लग्नात दिला सव्वा कोटी हुंडा; आमदार, नेत्यांसमोर पार पडला कार्यक्रम

कोरोना आहे की 'संपला'?

    भरतपुर, 25 जानेवारी : राजस्थानच्या (Rajasthan News) भरतपूर जिल्ह्यातील उच्चैन भागात एका निलंबित पोलिसाच्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सध्या या लग्नाची मोठी चर्चा सुरू आहे. लग्नात कोरोना गाइडलाइन्सचे (Corona Guidelines ) नियम पायदळी तुडवण्यात आले. शेकडोच्या संख्येने लोक मास्कशिवाय उपस्थित होते. या लग्नात आमदारांनीही उपस्थिती दर्शवली होती. सोमवारी हे लग्न पार पडलं. सध्या या लग्नाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात निलंबित पोलिसाने आपल्या मुलीला सव्वा कोटी रुपयांहून जास्त हुंडा दिला आहे. भ्रष्टाचार आणि लाच घेतल्या प्रकरणात पोलीस अर्जुन सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे. अर्जुन सिंहने आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. या लग्नात शेकडो लोक एकत्र आले होते. जेव्हा अर्जुन सिंहने आपल्या मुलीला सव्वा कोटीचा हुंडा दिला त्यावेळी स्थानिक आमदार आणि अन्य नेतेदेखील उपस्थित होते. हे ही वाचा-घरगुती वादाने गाठलं टोक; सासू पुजा करीत असताना सुनेने थेट गोळी झाडून केली हत्या! कायदेशीर प्रक्रिया सुरू... संपूर्ण प्रकरणात भरतपूर पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे की, निलंबित पोलीस अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर परीक्षण केलं जात आहे. तक्रारीनुसार, एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिला सव्वा कोटींहून अधिक कॅश दिली. या संपूर्ण प्रकरणात तपास केला जात आहे. याशिवाय कोरोना गाइडलाइन्सच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी जिल्हा कलेक्टर कारवाई करणार आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Marriage, Rajasthan

    पुढील बातम्या