Home /News /crime /

टाकीत होते पाच फुटापर्यंत पाणी, मायलेकराचा संशयास्पद बुडून मृत्यू

टाकीत होते पाच फुटापर्यंत पाणी, मायलेकराचा संशयास्पद बुडून मृत्यू

सिंटेक्स टाकीमध्ये पाच फूट पाणी होते व मयत महिलेची उंची पाच फुटापेक्षा जास्त होती. मग तिचा पाण्यात बुडून कसा मृत्यू झाला असा सवाल...

मुजीब शेख, प्रतिनिधी देगलुर, 05 जानेवारी : नांदेड (Nanded) शहरातील निलावार कॉम्प्लेक्समध्ये साई भोजनालय कुटुंबातील माय लेकराचा गच्चीवर असलेल्या पाण्याच्या सिंटेक्स टाकीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.  या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात असला तरी ही घटना घातपात तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. शहरातील शहाजी नगर भागातील निलावार कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर शहरातीलच रामपूर रोड  गणेशनगर येथील  मठपती कुटुंब साई भोजनालय चालवतात. सोमवार दि. 4 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मठपती कुटुंबातील शिवलीला साईनाथ मठपती (वय 23) व तिचा मुलगा प्रज्योत साईनाथ मठपती (वय 3) हे दोघे चौथ्या मजल्यावर पाणी असलेल्या सिंटेक्स टाकीमध्ये तरंगत असताना आढळून आले. भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष? आजार गंभीर होण्याआधीच काळजी घ्या मयत तीन वर्षांचा बालक हा खेळत खेळत जाऊन सिंटेक्स टाकी जवळ असलेल्या पेंटच्या बकिटावर चढून सिंटेक्स टाकी मध्ये असलेल्या पाण्यात पडला. तेव्हा त्याला वाचवण्यासाठी आईने प्रयत्न करत असताना तिचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, सिंटेक्स टाकीमध्ये पाच फूट पाणी होते व मयत महिलेची उंची पाच फुटापेक्षा जास्त होती. मग तिचा पाण्यात बुडून कसा मृत्यू झाला असा सवाल मयत मुलीच्या आई-वडिलांनी उपस्थित करून घातपाताची शंका वर्तविली आहे. सायंकाळी उशिरा माय लेकराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल नेमका काय येईल यावर पुढील तपास कसून केला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. काय आहे सरल जीवन विमा योजना? जाणून घ्या पॉलिसीविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी घटनास्थळी पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांनी तात्काळ धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेऊन योग्य त्या मार्गदर्शक सूचना तपासीक अंमलदार यांना देण्यात आले.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या