...आणि भर कोर्टात ढसाढसा रडायला लागली निर्भयाची आई; वडिलांच्या डोळ्यातही आलं पाणी

...आणि भर कोर्टात ढसाढसा रडायला लागली निर्भयाची आई; वडिलांच्या डोळ्यातही आलं पाणी

नराधमांची फाशी परत लांबणीवर गेल्याचं कळल्यावर निर्भयाच्या आई-वडिलांना भर कोर्टातच रडू फुटलं. त्यावर सुप्रीम कोर्टाने सांत्वन करताना सांगितलं, 'आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे पण...'

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : दिल्लीत 2012 साली झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. पुनर्विचार याचिका फेटाळली असली, तरी या बलात्काऱ्यांना दयेचा अर्ज नव्याने करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. अजूनही या नराधमांना फाशी दिली जात नाही हे सांगण्यासाठी कोर्टात उभ्या राहिलेल्या निर्भयाच्या आईला - आशादेवी यांना अश्रू अनावर झाले. त्या बोलता बोलता सुप्रीम कोर्टात दुःखातिरेकाने ढसाढसा रडू लागल्या. निर्भयाच्या वडिलांनाही या वेळी अश्रू अनावर झाले.

निर्भया प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा कायम असली, तरी शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. आता कोर्टाने दयेचा अर्ज करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिल्याने 7 जानेवारीला पुढच्या सुनावणीची तारीख देण्यात आली आहे.

संबंधित - निर्भयाच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी वकिलाने दिला गांधी हत्येचा दाखला

किमान जानेवारीपर्यंत तरी नराधमांना फाशी होऊ शकत नाही. निर्भयाच्या आई-वडिलांचा कोर्टातच संयम संपला आणि त्यांना रडू कोसळलं. त्यावर कोर्टाने या दोघांचं सांत्वन केलं.

"कोर्टाला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. आम्हाला कळतंय की कुणाचा तरी जीव गेला आहे. पण त्यांचे (दोषींचे) अधिकारही आहेत. आम्ही तुमचं ऐकायला इथे आहोत. पण आम्हीही कायद्याने बांधले गेलो आहोत," अशा शब्दात कोर्टाने प्रतिक्रिया दिली.

अन्य बातम्या

हैदराबाद Encounter: खळबळजनक खुलासा, आरोपींनी आधी 9 महिलांना बलात्कार करून जाळलं

पुन्हा अवॉर्ड वापसी सुरू? उर्दू कवी परत करणार पद्मश्री पुरस्कार; महाराष्ट्राबद्दल काय म्हणाले पाहा

'शरद पवार हे अफझल खान', देवेंद्र फडणवीसांनी 'तो' सामना वाचून दाखवताच मोठा गदारोळ

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 18, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading