नवी दिल्ली 12 जानेवारी : हुंडाबळी प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका व्यक्तीला आणि त्याच्या वडिलांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने म्हटलं की घर बांधण्यासाठी पैशांची मागणी करणं हेदेखील हुंडा (Dowry) मागणंच आहे. हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४बी अन्वये गुन्हा आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने असं निरीक्षण नोंदवलं, की हुंडा मागणी या सामाजिक दुष्प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी आयपीसीमधील कलम 304-बीची तरतूद केली गेली आहे.
Mumbai:'लिव्ह इन पार्टनर'च्या बाळाचा 5 लाखात केला सौदा, कथित बापासह 11जणांना अटक
एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती यांची मागणी करणं, हा हुंडाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देत म्हटलं होतं, की घराच्या बांधकामासाठी पैसे मागणं, म्हणजे हुंड्याची मागणी करणं असून शकत नाही. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मध्य प्रदेश सरकारकडून याचिका दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी केली. या घटनेत एका महिलेनं सासरकडच्या लोकांकडून घराच्या कामासाठी होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली होती. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणात महिलेचा पती आणि सासरा यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या दोघांनाही दोषी घोषित करत, त्यांना शिक्षा सुनावली आहे. तसंच घराच्या कामासाठी पैसे मागणं, हेदेखील हुंड्याची मागणी करणंच असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.