Home /News /crime /

जेलमध्ये जायचं नसेल, तर लग्न करावं लागेल; सुप्रीम कोर्टाचा इशारा!

जेलमध्ये जायचं नसेल, तर लग्न करावं लागेल; सुप्रीम कोर्टाचा इशारा!

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) गंभीर इशारा दिला आहे. या तरुणाने लग्न न केल्यास त्याला जेल जावं लागेल असं न्यायालयानं बजावलं आहे.

  नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) गंभीर इशारा दिला आहे. या तरुणाने लग्न न केल्यास त्याला जेल जावं लागेल असं न्यायालयानं बजावलं आहे. या प्रकरणातील तरुण पंजाबमधील असून त्याच्या विरोधात लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कोर्टाचा आदेश काय? सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्या. ए.एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी तरुण हा पंजाबमधील उच्च जातीमधील आहे. तर तरुणी ही अनुसूचित जातीमधील असून सध्या ऑस्ट्रेलियात राहत आहे. यावेळी तरुणाच्या वकिलानं न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार 22 डिसेंबर 2020 रोजी दोघांमध्ये लग्नाबाबत सहमती झाली असून तसा करार देखील झाला आहे. संबंधित तरुणी सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ती भारतामध्ये परतल्यावर दोघांचं लग्न होईल. दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  (वाचा - अखेर बिंग फुटलं, आठ जणांची हत्या करुन आश्रमात राहणाऱ्या भोंदू बाबाला अटक!)

  त्यावर, हा करार कारवाई टाळण्यासाठी केलेला नाही ना? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केली. त्याचबरोबर तरुणानं लग्न करण्यास टाळाटाळ केल्यास त्याची रवानगी ही थेट जेलमध्ये केली जाईल हे लक्षात ठेवावं असा इशारा न्यायालयानं दिला. तरुणाच्या वकिलानं न्यायालयाला आश्वासन दिल्यानंतर या तरुणाच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. काय आहे प्रकरण? या प्रकरणातील पीडित तरुणी 2016 साली उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेली होती. त्यावेळी तिची या तरुणाशी मैत्री झाली. तरुणानं तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव जातीचे कारण देत तरुणीनं फेटाळला. त्यावर लग्नामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असं आश्वासन तरुणानं दिलं.

  (वाचा - अविवाहित पुरुषांशी खोटं लग्न करणाऱ्या तरुणींच्या टोळीला पुण्यात अटक)

  आरोपी तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याबाबत बळजबरी केली. तरुणी या संबंधाला तयार नाही हे पाहून त्यानं गुंगीचं औषध देऊन तरुणीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. काही दिवसांनी हे दोघेही भारतामध्ये परतले. हे प्रकरण पुढे वाढत गेल्यानंतर तरुणाविरोधात बलात्कार (Rape) आणि फसवणुकीचा (Cheating) गुन्हा दाखल करण्यात आला. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं त्याचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर या तरुणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Haryana, Punjab, Supreme court

  पुढील बातम्या