Home /News /crime /

सासूने एक पोळी जास्त खाल्ली म्हणून सुनेकडून मारहाण; Video पाहून संताप येईल!

सासूने एक पोळी जास्त खाल्ली म्हणून सुनेकडून मारहाण; Video पाहून संताप येईल!

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

  चंदीगड, 27 मार्च : हरयाणातील (Haryana News) सोनीपतमध्ये नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका व्हायरल व्हिडीओमध्ये (Shocking Video Viral) सून आपल्या सासूला मारहाण करताना दिसत आहे. आरोप आहे की, नातवाने आजीला खाण्यासाठी पोळी दिली होती. आजीने पोळी खाल्ली म्हणून वाद झाला आणि सून मारहाण करू लागली. या घटनेचे दोन वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात एक सून आपल्या सासूला घराच्या बाहेर आणि एका खोलीत मारहाण करताना दिसत आहे. वृद्धेने केलेल्या तक्रारीनंतर सून मनिषा, तिची आई आणि भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  ही घटना सोनीपत गावातील सांदल खुर्द येथील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सासू इशवंतीला तिची सून घराच्या बाहेर घेऊन जाते आणि तिला जबदरस्तीने काहीतरी विचारताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये सून सासूला मारहाण करताना दिसत आहे.

  हा प्रकार नातवाने दिलेल्या चपातीवरुन झाला. विधवा इशवंती (75) हिने सोनीपत एसपीकडे मारहाणीबाबत तक्रार केली आहे. यात तिने मुलगा मुकेशची पत्नी मनिषा ही छळ करीत असल्याचं सांगितलं. सून सकाळ-सायंकाळी दोन चपात्या देते. सूनेने पाच दिवसांपूर्वी दिलेल्या चपत्या खाल्ल्या होत्या. यानंतर नातू आणखी एक पोळी घेऊन आला. त्याने आग्रह केला म्हणून सासूने चपाती खाल्ली. ही बाब सूनेला कळताच ती सासूसोबत भांडू लागली. आणि तिला मारहाण केली.

  हे ही वाचा-चालत्या कारच्या खिडकीतून उडू लागली 'पापा की परी'; शालेय विद्यार्थीनीचा जीवघेणा स्टंट VIDEO VIRAL

  कुटुंबात आधीपासून सुरू आहे वाद... सून मनिषाने पती मुकेश आणि अन्य सदस्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ती माहेरीच राहते. काही दिवसांपूर्वी ती सासरी आली होती. तर दुसरीकडे सासू इशवंतीने सुनेवर मारहाणीचा आरोप केला आहे. मुकेशने सांगितलं की, तो आणि त्याचा भाऊ आपल्या वृद्ध आईसोबत राहतात. ते स्वयंपाकही वेगळा करतात. मात्र तरीही पत्नीने वृद्ध आई आणि अन्य जणांचं जगणं अवघड केलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Haryana, Shocking video viral

  पुढील बातम्या