मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयंकर! घरगुती वाद पोहोचला शिगेला, पाच लेकींसह आईची आत्महत्या

भयंकर! घरगुती वाद पोहोचला शिगेला, पाच लेकींसह आईची आत्महत्या

घरगुती वाद विकोपाला गेल्याने वैतागलेल्या महिलेनं आपल्या पाच मुलींना घेऊन विहीरीत उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

घरगुती वाद विकोपाला गेल्याने वैतागलेल्या महिलेनं आपल्या पाच मुलींना घेऊन विहीरीत उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

घरगुती वाद विकोपाला गेल्याने वैतागलेल्या महिलेनं आपल्या पाच मुलींना घेऊन विहीरीत उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

    कोटा, 5 डिसेंबर: घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे महिलेनं (Woman suicide with 5 daughters) आपल्या पाच मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. घरात अनेकदा किरकोळ कारणांवरून (Fight over ordinary reasons) पती आणि पत्नीमध्ये भांडणं होत असतात. मात्र ही भांडणं जर मिटली नाहीत, तर ती विकोपाला जाताना दिसतात. सततच्या भांडणाला वैतागून अनेकजण (Decision to suicide) टोकाचा निर्णय़ घेताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून एका महिलेनं आपल्या मुलींसह आत्महत्या केली आहे. घरगुती वादाची पार्श्वभूमी राजस्थानमधील कोचिंग नगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोटामध्ये शिवलाल आणि त्याची पत्नी बादाम देवी हे कुटुंबासोबत राहत असत. या जोडप्याला एकूण 7 मुली होत्या. सर्वात मोठी मुलगी 13 वर्षांची तर सर्वात लहान मुलगी 1 वर्षाची होती. या दोघांमध्ये घरगुती कारणांवरून सतत भांडणं होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सात मुलींसह संसार करताना कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद सुरू व्हायचा आणि सतत तो विकोपाला जायचा. रोजच्या भांडणांना पती आणि पत्नी दोघंही वैतागले होते. मुलींसह आत्महत्या घटनेच्या दिवशी पती शिवलाल घरी नव्हता. काही कामानिमित्त तो बाहेर गेला होता. त्याच रात्री आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय बादाम देवी यांनी घेतला. त्यांनी आपल्या पाच मुलींना घेऊन विहीरीत उडी मारली. त्यातील कुणालाही पोहायला येत नव्हतं. या घटनेत बादाम देवी आणि त्यांच्या पाचही मुलींचा बुडून मृत्यू झाला. सहाही मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. हे वाचा- भयंकर! पत्नीला कुरूप बनवण्यासाठी नवरेच करतात हे विचित्र काम, वाचूनच व्हाल सुन्न भांडणं झाली नसल्याचा दावा आपली पत्नीसोबत कधीही कडाक्याची भांडणं होत नव्हती, अशी माहिती शिवलालने पोलिसांना दिली असून या घटनेमुळे आपल्याला जबर धक्का बसल्याचं म्हटलं आहे. सातपैकी पाच मुली घटनेच्या वेळी घराबाहेर गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Daughter, Mother, Police, Rajsthan, Suicide

    पुढील बातम्या