प्रदीप साहू, चरखी दादरी, 17 मार्च: दंगल गर्ल (Dangal Girl) गीता आणि बबीता फोगट (Geeta and Babita Phogats Cousin) यांची मामे बहीण कुस्तीच्या अंतिम सामन्यात (wrestling final match) झालेला पराभव स्विकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. तिने बलाली येथे राहणाऱ्या आपल्या काकाच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह (Dead body) नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. संबंधित महिला कुस्तीपटू गेल्या अनेक वर्षांपासून आपले काका महाबीर पैलवानच्या यांच्या घरी कुस्तीचा सराव करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दंगल गर्ल गीता आणि बबीता फोगाट यांच्या 17 वर्षीय मामे बहिणीचं नाव रितिका असून ती राजस्थानच्या झंझनू जिल्ह्यातील जैतपूर या गावातील रहिवासी आहे. मृत रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.
हा पराभव तिच्या जिव्हारी लागला होता. यावेळी स्टेडियममध्ये महाबीर फोगट देखील उपस्थित होते. अंतिम सामन्यात झालेला पराभव रितिकाच्या जिव्हारी लागल्याने तिने 15 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास महाबीर फोगट यांच्या बलाली गावातील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. तिने तिच्या खोलीतील पंख्याला ओढणी बांधून आपला प्राण त्याग केला आहे.
(हे वाचा - पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या, गळफास लावत संपवलं जीवन)
तिने गळफास लावून आत्महत्या केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पहिलवान रितिकाने 15 मार्च रोजी रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील एका खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यांनंतर मृतदेहावर दादरी येथील सिव्हील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून झोझू कलां पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे. यावेळी डीएसपी रामसिंह यांनी सांगितलं की, मृतदेहाचं शवविच्छेदन झालं असून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं आहे. भरतपूर या ठिकाणी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत रितिकाचा अवघ्या एका गुणाने पराभव झाला होता. याचा तिला चांगलाचं धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आलं नाही. त्यामुळे नैराश्य आल्याने तिने स्वतःला संपवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, India, Shocking news, Sports, Suicide