• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • तीन वर्षं सतत विचारणा करूनही प्रेयसीचा लग्नाला नकार, निराश तरुणाने स्वतःच्या डोक्यात मारली गोळी

तीन वर्षं सतत विचारणा करूनही प्रेयसीचा लग्नाला नकार, निराश तरुणाने स्वतःच्या डोक्यात मारली गोळी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

प्रेयसीने लग्नाला नकार (denial for marriage) दिला म्हणून तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी (fired himself) मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघड झाली आहे.

 • Share this:
  लुधियाना, 20 ऑगस्ट : प्रेयसीने लग्नाला नकार (denial for marriage) दिला म्हणून तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी (fired himself) मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघड झाली आहे. तीन वर्षांपासून या तरुणाचं एका तरुणीवर प्रेम (Love affair) होतं. तो वारंवार तिला लग्नासाठी विचारणा करत होता. मात्र सतत मिळणाऱ्या नकारामुळे निराश झालेल्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. तीन वर्षांपासून अफेअर हरियाणातील जिंद भागात राहणाऱ्या 24 वर्षांच्या विकासचं गावातीलच एका मुलीवर प्रेम होतं. गेल्या तीन वर्षांपासून तो तिला लग्नासाठी मागणी घालत होता. मात्र तरुणीला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. एकदा तर विकास घरच्यांना घेऊन तरुणीच्या घरी तिला मागणी घालायलाही गेला होता. मात्र तरुणी तयार नसल्याने तिच्या घरच्यांनी या प्रस्तावाला नकार दिला. तेव्हापासून विकासचं मानसिक स्वास्थ्य ठिक नव्हतं. गेल्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न गेल्या वर्षीदेखील तरुणीला विकासने मागणी घातली होती. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार करत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता लग्नाला नकार मिळाल्यानंतर निराशेच्या गर्तेत या तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पटियाला हायवेवर पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांना त्याच्याकडे सुसाईट नोटही सापडली असून त्यात तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची नावं लिहिलेली आहेत. हे वाचा - Amazon वरून विष मागवून तरुणाची आत्महत्या, मोबाईल चेक केल्यावर आईवडिलांना धक्का तरुणीच्या भावाने केली होती तक्रार विकासने घरात घुसून गोळीबार केल्याची तक्रार तरुणीच्या भावाने नोंदवली होती. त्यानंतर पोलीस विकासचा शोध घेत होते. तरुणीला लग्नासाठी विचारणा करायला गेला असताना विकासनं रागाच्या भरात बंदूक चालवल्याचं त्याच्या भावानं सांगितलं आहे. विकासच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: