Home /News /crime /

अधिकारी तिला हॉटेलमध्ये बोलवून बलात्कार करायचा; प्रियकराच्या लागलं जिव्हारी, उचललं टोकाचं पाऊल

अधिकारी तिला हॉटेलमध्ये बोलवून बलात्कार करायचा; प्रियकराच्या लागलं जिव्हारी, उचललं टोकाचं पाऊल

एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. दोघे एकमेकांना ओळखत होते आणि ते लवकरच लग्न करण्याच्या विचारात होते. मात्र, मुलीच्या गावातील सुनील नावाचा एक सरकारी अधिकारी त्या दोघांना त्रास देत होता.

    हिसार, 26 सप्टेंबर : प्रेम प्रकरणात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांच्या मध्ये तिसरा आला आणि त्यानं या दोघांची भविष्यातील स्वप्ने धुळीस मिळवली. इतकेच नाही तर त्याने तरुणाच्या प्रेयसीसोबत बलात्कार (Rape on Girl) केला. आपल्या प्रेयसीसोबत झालेला प्रकार जिव्हारी लागल्यामुळं या तरुणाने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले. या दोघांमध्ये आलेला तिसरा व्यक्ती एक सरकारी अधिकारी असल्याचे समोर आले आहे. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील (suicide case in hisar) ही घटना असून प्रियकर आणि त्याची प्रेयसी या दोघांना एक सरकारी अधिकारी त्रास देत होता. त्याच्यावर संबंधित प्रेयसीला धमकावणे आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Rape case) करण्याचा आरोप आहे. हिसारमधील बद्दोपट्टी गावातील सत्य प्रकाश उर्फ सोनू याचे शेजारील गाव शिकारपूर येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघे एकमेकांना ओळखत होते आणि ते लवकरच लग्न करण्याच्या विचारात होते. मात्र, मुलीच्या गावातील सुनील नावाचा एक सरकारी अधिकारी त्या दोघांना त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने स्वतःच्या घरात पंख्याला लटकवून आत्महत्या केली. हे वाचा - 10 मिनिटात दीड लिटर Coca Cola प्यायला; पोटात भरपूर गॅस झाला आणि घडली भयंकर घटना आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली सुसाईड नोट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले की, शिकारपूर गावातील रहिवासी आणि पाटबंधारे विभागात कार्यरत असलेले सुनील यांना माझे व माझ्या प्रेयसीच्या प्रेम संबंधाबद्दल माहिती मिळाली होती. यावरून ते वारंवार तरुणीला धमकावत होते. त्यांचे लग्न देखील झाले असून त्यांना सहा ते सात महिन्यांचे मूल देखील आहे. तरीही ते जवळपास दोन महिन्यांपासून माझ्या प्रेयसीला ब्लॅकमेल करत होते. ते प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलवायचे आणि दिवसभर तिला तिथे ठेवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करायचे. याबाबत तिने मला सांगितले होते. हे वाचा - क्रूर! माहेरवाशीण महिलेनं केली धाकट्या बहिणीची हत्या, गुन्हा लपवण्यासाठी घरातच केलं दफन सोनूला जीवे मारण्याची धमकी सोनूने या प्रकाराचा जाब सुनील यांना विचारला होता. त्यावर त्यांनी सोनुला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि दोघांची बदनामी करण्याचीही धमकी दिली होती. या सर्व प्रकारामुळे प्रचंड नाराज झालेल्या सोनूने गुरुवार किंवा शुक्रवारच्या दरम्यान आपल्या घरात पंख्याला लटकवून घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे आता आरोपी सुनील याला भारतीय दंड संहिता कलम 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करत अटक केली आहे. सोनू याच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केले जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rape, Rape news, Suicide

    पुढील बातम्या