मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मॅडमना बघून त्यानं मागून मारली शिट्टी; 3 शिक्षकांनी मिळून 40 पोरांना बदडलं, प्रकरण पोलिसात

मॅडमना बघून त्यानं मागून मारली शिट्टी; 3 शिक्षकांनी मिळून 40 पोरांना बदडलं, प्रकरण पोलिसात

Demo Pic

Demo Pic

एका विद्यार्थ्यानं महिला शिक्षिका आल्यावर शिट्टी वाजवली. यानंतर सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय.

फतेहाबाद, 10 सप्टेंबर : वर्गातील एका विद्यार्थ्याच्या चुकीमुळे संपूर्ण वर्गाला शिक्षा भोगावी लागल्याचा प्रकार आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेला किंवा ऐकलेला तरी असतोच. अशाच एका घटनेत शिक्षिका वर्गात आल्यानंतर मागील बाकावर बसलेल्या एका विद्यार्थ्याने शिट्टी (Students Beaten in School) वाजवली. यावर भडकलेल्या शिक्षिकेनं आणखी काही शिक्षकांना बोलावून घेत सर्वच विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद देण्यास सुरुवात केली. या प्रकरणात काही विद्यार्थी जखमी झाले असून शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

एका विद्यार्थ्याच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण वर्गाला शिक्षा झाल्याचा हा प्रकार आहे. 11 वीच्या वर्गात शिक्षिका आल्यानंतर एका विद्यार्थ्यानं शिट्टी वाजवल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना छडीचा मार मिळाला. हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात घडलेल्या या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. महिला शिक्षिका पी.टी.आय. रजनी, कंप्यूटर अटेंडंट मांगेराम व शिक्षक चरणजीत सिंह यांच्याविरोधात ही तक्रार नोंद झाली आहे.

शिक्षक दिनाच्या एका दिवसानंतर वरिष्ठ शासकीय माध्यमिक शाळेतील 11 वीच्या वर्गात ही घटना घडली. एका विद्यार्थ्याच्या गैरवर्तनामुळं शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना लाठ्यांनी बेदम मारहाण केली. काही विद्यार्थ्यांच्या कमरेला, हातांवर माराच्या खुणा होत्या यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी त्यांची वैद्यकीय चाचणी करून घेऊन त्या अहवालाच्या आधारे शिक्षकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

हे वाचा - आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

सध्याच्या काळात विद्यार्थी शिक्षकांना फारसा आदर देत नसल्याचं चित्र अनेकदा दिसून आलंय. याची कारणं वेगवेगळी असली तरी एखाद्या महिलेची भरवर्गात छेड काढण्याच्या प्रकाराचं समर्थन करता येणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी सांगितले की, सकाळच्या वर्गात, जेव्हा महिला शिक्षिका वर्गात शिकवण्यासाठी गेली, तेव्हा मागे बसलेल्या विद्यार्थ्याने शिटी वाजवली. यानंतर तीन शिक्षकांनी सर्वांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे अनेक मुलांना चक्कर येऊ लागली. शिक्षकांनी आमच्यापैकी कोणाचेच ऐकले नाही आणि लाठ्यांनी मारहाण केली. शाळेत जाण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असेही बोलले जात आहे.

हे वाचा - बंद खाणीच्या तळ्यात आढळला 3 वर्षांच्या मुलांसह वडिलाचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ

गटशिक्षणाधिकारी मुकेश शर्मा यांच्याशी फोनवर संवाद साधला असता, त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्याचं सांगितलं. एका विद्यार्थ्यानं महिला शिक्षिका आल्यावर शिट्टी वाजवली. यानंतर सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणाची चौकशी सुरू असून माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच प्रकरण मिटवलं जाईल, असं ते म्हणाले.

First published:
top videos

    Tags: School teacher, Teacher