वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी 15 वर्षीय मुलाची आत्महत्या; क्षुल्लक कारणावरुन संपवलं जीवन

वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी 15 वर्षीय मुलाची आत्महत्या; क्षुल्लक कारणावरुन संपवलं जीवन

दहावीच्या मुलाने परीक्षेत नापास झाल्यामुळे वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी आत्महत्या केली आहे.

  • Share this:

पंजाब, 03 नोव्हेंबर: मुलं कधी काय वागतील याचा नेम नसतो. विशेष म्हणजे टीनएजमधल्या मुलांच्या मनाची अवस्था अत्यंत नाजूक असते त्यामुळे त्यांना फारच जपावं लागतं. एका दहावीच्या मुलाने वाढदिवसाच्या एक दिवस आधीच आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. दहावीमध्ये शिकणारा हरेंद्र सिंह आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सीबीएसईच्या दहावीच्या वर्गात शिकत असताना 2 वेळा  एका विषयामध्ये तो नापास झाला होता.

नापास झालेल्या हरेंद्रने आपल्या घरातील रायफलने स्वत:वर गोळ्या झाडून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे त्यांच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातली ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला आहे. पोलिसांनी याबाबत त्याच्या मित्रांकडे आणि आई वडिलांकडे चौकशी केली, तेव्हा गणिताच्या परीक्षेत 2 वेळा नापास झाल्यामुळे हरेंद्र दु:खी झाला होता अशी माहिती त्याच्या आई वडिलांकडून मिळाली.

सोमवारी हा सगळा प्रकार घडला आणि मंगळवारी त्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा यासाठी त्याचे आईवडील योजना आखत होते. पण वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी हरेंद्र आपलं आयुष्य संपवलं आहे. हरेंद्रचे आईवडील अत्यंत दु:खी आहेत. एकुलत्या एक मुलाच्या जाण्यामुळे त्यांच्या जगण्याचं कारणच हरवल्यासारखं झालं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 3, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या